Maharashtra Live News Update: कुमशी ग्रामसभेत दगडफेक व मारहाण; तिघे गंभीर जखमी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, नरहरी झिरवाळ अडचणीत, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam
Published On

कुमशी ग्रामसभेत दगडफेक व मारहाण; तिघे गंभीर जखमी

बीड तालुक्यातील कुमशी गावात ग्रामसभेदरम्यान दगडफेक आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ल्याची घटना घडली. “ग्रामसभेत येऊ नका” असे म्हणत एका टोळक्याने तिघांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे काही व्हिडिओ समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवलेला नाही.

सप्तशृंगी गड यात्रेत दुर्दैवी घटना; नंदुरबारच्या १८ वर्षीय भाविकाचा बुडून मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात गिरणा नदीत बुडून नंदुरबारच्या १८ वर्षीय पवन सोनवणे या भाविकाचा मृत्यू झाला. चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर पालखी घेऊन जात असताना तो बेज-भादवन परिसरात आंघोळीसाठी नदीत उतरला. पाय घसरल्याने तो खोल पाण्यात गेला. पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

महिला महाराष्ट्र केसरीत उलथापालथ; वेदीका ससाणेचा दणदणीत विजय, अमृता पुजारी अंतिम फेरीत

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठी उलथापालथ झाली असून प्रमुख दावेदार सांगलीच्या प्रतीक्षा पाटील हिला कोल्हापूरच्या वेदीका ससाणे हिने ५-० ने पराभूत केले. दुसऱ्या उपांत्य फेरीत अमृता पुजारीने सृष्टी भोसलेचा ३-१ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी वेदीका ससाणे आणि अमृता पुजारी यांच्यात रंगतदार लढत होणार आहे.

चांदसैली घाटात अस्वलाचा वावर; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील चांदसैली घाटात अस्वलाचा वावर आढळून आला आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला अस्वल दिसले असून त्याने मोबाईलवर त्याचा व्हिडिओ टिपला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अस्वलाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

चामोर्शी गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात अपघातात तीन जणांचा मृत्यू

गडचिरोली वरून कोणसरी येथील कर्मचारी वर्गाला घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स व आष्टी कडून गडचिरोलीकडे जाणारी स्कार्पियो यांच्यामध्ये समोरासमोर भीषण अपघात होऊन यामध्ये पाच जण मृत पावल्याची घटना घडलेली आहे सदर घटनास्थळी माहिती मिळताच चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी घटनांसाठी दाखल झालेले आहेत सदर उर्वरित जखमी झालेल्यांना चामोर्शी रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहेत.

जंबो ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी

पश्चिम रेल्वेवर जंबो ब्लॉकमुळे तब्बल 300 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर देखभाल काम सुरू असल्यामुळे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. गाड्या विरार लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून तर चर्चगेट लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून सोडण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट; पिकांचे नुकसान होण्याची भीती

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला आणि चांदवड भागात संध्याकाळी अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि अल्पावधीतच हलक्या स्वरूपात पाऊस व गारांचा मारा झाला. या बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत पडले असून, गहू आणि कांदा पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी शेतकरी शेतात धाव घेत आहेत.

शिरपूर बस आगारात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

शिरपूर बस आगारात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

कर्मचाऱ्यांमधील दोन गट आपापसात भिडले

एसटी कर्मचाऱ्याला कपडे फाडून करण्यात आली जबरदस्त मारहाण

लाथा बुक्क्यांनी जबर करण्यात आली मारहाण

मारहाणीत दोन कर्मचारी जखमी

शिरपूर बस स्थानकात तणावाचे वातावरण

जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल

झिरवळ व्हिडिओ प्रकरणी चौकशीची मागणी; आमदार इद्रिस नायकवडी आक्रमक

सांगलीत मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामागे नेमके कोण आहे, हेही तपासले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. एखाद्याच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करून व्हिडिओ शूट करणे हा गुन्हा असल्याचे सांगत त्यांनी नरहरी झिरवळ यांची पाठराखण केली.

अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; ९८ टक्के मतदान

अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडले. तब्बल ९८ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. वाशिम जिल्ह्यातील ५ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीतील १० उमेदवार आधीच अविरोध निवडून आले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील एकूण ११ जागांसाठी मतदान झाले असून उद्या मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

मावळ तालुक्यातील कामशेतमध्ये सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

मावळ तालुक्यातील कामशेत येथे पाण्याच्या टाकीजवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचा पोलिसांना संशय असून, कामशेत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. खून घटनास्थळीच झाला की मृतदेह बाहेरून आणून टाकण्यात आला, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

चुकीच्या मार्गाने १०० रुपये कमवाल, तर जागा तुरुंगातच!" पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना दम

चुकीच्या मार्गाने १०० रुपये कमवाल, तर जागा तुरुंगातच! असे पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये एलपीजी गॅससाठी तीन किलोमीटर रांग

छत्रपती संभाजी नगरमध्ये एलपीजी गॅस साठी तीन किलोमीटर पर्यंत रिक्षांची रांग असल्याची बातमी समोर आली आहे. शहरापासूनच थोडे अंतरावर असलेल्या जळगाव महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपावर गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

Beed : गेवराईत मूकबधीर तरुणाला दोघांकडून लाकडी दांड्याने मारहाण

बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंपेगाव येथे 24 वर्षीय मूकबधिर तरुण शेळ्या चालण्यासाठी शेतात गेला असता किरकोळ कारणावरून दोघांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी तरुणाच्या भावाच्या फिर्यादीवरून बाबासाहेब मासाळ आणि चंदू मासाळ या दोन आरोपींच्या विरोधात गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावर होत असलेला परिणामावर पुण्यात बैठक

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन

बैठकीत उपाययोजनांवर होणार चर्चा

प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीचे आयोजन

औद्योगिक संघटना आणि उद्योजक उपस्थित

अशोक खरात प्रकरणी SIT चा महत्त्वपूर्ण पत्र व्यवहार

- भोंदू अशोक खरात प्रकरणी SIT चा महत्त्वपूर्ण पत्र व्यवहार

- आयकर विभाग, मुद्रांक शुल्क नोंदणी विभाग आणि पासपोर्ट विभागासोबत SIT चा पत्र व्यवहार, सूत्रांची माहिती

- अशोक खरातची संपत्ती, मालमत्ता, आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पत्र

- तर खरातच्या मालमत्तांच्या चौकशीसाठी मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाला पत्र

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांची चारचाकी उलटली 

अहिल्यानगरमधील जामखेड कर्जत रोडवर फिरायला निघालेल्या नववी-दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थी मित्रांची चारचाकी उलटली.

चारचाकी गाडीतील 7 तरुण विद्यार्थी गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक...

Nashik : ग्रेट व्हाइट पेलिकन नांदूर मध्यमेश्वरमध्ये आगमन 

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य सध्या एका दुर्मिळ पक्षीच्या दर्शनामुळे चर्चेत आले आहे. आपल्या परतीच्या प्रवासात असलेल्या ग्रेट व्हाईट पेलिकन किंवा रोजी पेलिकन' या पक्ष्यांचे दर्शन पहिल्यांदा झाले आहे

Dombivli : डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का, डोंबिवली शहर प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश 

डोंबिवलीत उबाठाला धक्का बसला आहे. डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.

Nashik : नाशिकमध्ये भोंदू बाबाचा कारभार उघड; महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप

नाशिकमध्ये एका तथाकथित भोंदू बाबाच्या कारभारावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कॅप्टन खरात नावाच्या या तांत्रिक बाबावर तब्बल अकरा गुन्हे दाखल झाले आहेत.

सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपाला टाळे

- सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपाला टाळे

- सोलापुरातील जवळपास 18 हजार रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद

- पुढील वीस दिवस कोणत्याही ऑटो एलपीजी गॅस पंपाला गॅस मिळणार नसल्याने रिक्षाचालकांची उपासमार

- सोलापुरात आरटीओ नोंदणीकृत 18 हजार ऑटो एलपीजी रिक्षा चालकांना रोज 22 टन गॅसचा पुरवठा केला जातो.

- पेट्रोलच्या तुलनेत गॅस स्वस्त मिळतो आणि त्याला मायलेज देखील जास्त मिळत असल्याने रिक्षाचालकांचा ओढा ऑटो एलपीजीकडे आहे.

Pandharpur : एकादशीच्या दिवशी विठुरायाला पुरण पोळीचा नैवेद्य

आज चैत्री एकादशीच्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीला परंपरेनुसार पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.

चैत्री एकादशीला शंभु महादेवाचा विवाह सोहळा झाला होता. त्यावेळी भगवान पांडुरंगाने विवाह सोळ्यात भोजन केल्याची आख्यायिका सांगितली जाते.

त्यानुसार 24 एकादशी पैकी फक्त चैत्रीला एकादशीला विठुरायाला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.

त्यानुसार आज विठुरायाला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.

Hingoli : महसूल प्रशासनाने वाळू माफियांचे कंबरडे मोडले, नदीतील बोटीना आग लावली

पोलीस व महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धुळपेक करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात हिंगोलीत मोठी कार्यवाही करण्यात आली आहे

महसूल प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून बोटद्वारे वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या बोटींना महसूल प्रशासनाने आग लावत लाखो रुपयांचे साहित्य नष्ट केले आहे

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी शिवारात कयाधू नदीच्या पात्रात ही मोठी कार्यवाही करण्यात आली आहे

Nashik : रुपाली चाकणकरांना एसआयटीकडून समन्स

- रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती

- शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती

- एसआयटी सर्व आजी माजीसदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती

- रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होण्याची शक्यता

- शिवानीका संस्थांचे सर्व व्यवहार आता SITच्या रडारवर

Parbhani : परभणीत पोलिसांवर दगडफेक

परभणीच्या सेलू शहरातील रहेमान नगर येथील कत्तलखान्यावर गौवंश हत्या प्रकरणी पोलिसाकडे आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई केली आणि गोमांस ही जप्त केले

या रागात पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली

या प्रकाराने सेलू शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या दगडफेकीत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही

युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावर होत असलेला परिणामावर पुण्यात बैठक

युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावर होत असलेला परिणामावर पुण्यात बैठक

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन

बैठकीत उपाययोजनांवर होणार चर्चा

प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीचे आयोजन

औद्योगिक संघटना आणि उद्योजक उपस्थित

Kalyan : कल्याण रेल्वे स्थानकात राडा, दिव्यांग प्रवाशाला मारहाण

  • कल्याण रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना

  • लोकल मधून उतरताना दोन प्रवाशांमध्ये वाद

  • काही क्षणात दोघांमध्ये तुफान हाणामारी

  • मध्यस्थी करण्यास गेलेला दिव्यांग खाली पडला

  • संतापलेल्या दिव्यांग इसमाने देखील एका प्रवाशाला केली मारहाण

  • मारहाणीचा VIDEO सोशल मीडियावर VIRAL

Nashik: भोंदू अशोक खरात प्रकरण, SIT चे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी कोर्टात दाखल

नाशिक-

- भोंदू अशोक खरात प्रकरण

- SIT चे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी कोर्टात दाखल

- सूर्यवंशी यांच्यासह इतर सहकारीही कोर्टात दाखल

- थोड्याच वेळात अशोक खरातला कोर्टात हजर करणार

- तपासाच्या कागदपत्रांच्या फाईल घेऊन SIT चं पथक कोर्टात पोहचलं

Nashik: भोंदू अशोक खरातला ११ वाजता कोर्टात हजर करणार

नाशिक -

- भोंदू अशोक खरातला ११ वाजता कोर्टात हजर करणार

- खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढविण्यासाठी SITची रणनीती

- खरातच्या मालमत्तेशी संबंधित व्यक्तींना SIT ने समन्स बजावल्याची माहिती

- खरातची मालमत्ता भोंदूगिरी करून मिळवल्याच्या संशयातून तपास यंत्रणेच्या रडारवर

- गेल्यावेळी पोलीस कोठडी मिळाल्यानंतर खरात विरोधात ५ गुन्ह्यांची पडलीय भर

- नव्या गुन्ह्यांचा तपास आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर SIT ची चौकशी बाकी

- या सगळ्या ग्राउंडवर SIT आणखी पोलीस कोठडीची करणार मागणी

Pune: राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, पुढील 4 दिवसात कमाल तापमानात मोठा बदल होणार

पुणे -

राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

कमाल तापमानात मोठा बदल नाही

नागरिकांना उकड्यापासून दिलासा

राज्याच्या बहुतांश भागात येत्या 30 मार्च ते एक एप्रिल या कालावधीत सोसाट्याचा वारा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

पुढील चार दिवसात राज्याच्या कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही,त्यानंतर दोन ते तीन अंशाने हळूहळू घट होईल अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे

राज्यातील नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे

Dharashiv: धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकाला फटका

धाराशिव -

धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकाला फटका

उत्पादन खर्च ही निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल

वाशी तालुक्यातील इंदापूर शिवारात अवकाळी गारपिटीचा कांदा पिकाला मोठा फटका

Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर-

छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

एन-६ सिडको परिसरातील साईनगर येथे शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली.

३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाच्या राहत्या घरातच ही घटना घडली.

याच्या कानाजवळून डोक्याच्या आरपार गोळी गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. समीरने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Akola: अकोला- वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आज मतदान, ५ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात

अकोला -

अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूकीसाठी आज मतदान होतं आहे

सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे.

वाशिम जिल्ह्यातील ५ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

या निवडणुकीतील १० उमेदवार आधीच अविरोध निवडून आलेत तर दोन्ही जिल्ह्यातील एकूण ११ जागांसाठी हे मतदान पार पडतेय.

उद्या ३० मार्च रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

Washim: वाशिमच्या जनसंघर्ष अर्बन निधी शाखेतील साहित्य पोलिसांनी घेतले ताब्यात

वाशिम -

जनसंघर्ष अर्बन निधी शाखेतील साहित्य पोलिसांनी घेतले ताब्यात

वाशीमच्या मानोरा शहरात अनेक दिवसापासून बंद असलेल्या अवस्थेत असलेल्या वादग्रस्त जनसंघर्ष अर्बन निधी शाखेतील साहित्य न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ताब्यात घेऊन दिग्रस पोलीस स्टेशनला जमा केले.

जनसंघर्ष अर्बन निधी शाखेत घोटाळा केल्याप्रकरणी मुख्य सुत्रधार प्रणित मोरे यांच्यासह त्यांचे साथीदार आरोपी सध्या कारागृहात बंद आहेत.

Nashik: भोंदू अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात करणार हजर

नाशिक -

- भोंदू अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात करणार हजर

- अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपत असल्यानं न्यायालयात हजर करणार

- आतापर्यंत अशोक खरातवर लैंगिक छळ आणि फसवणुकीचे १० गुन्हे

- १० पैकी ८ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे तर २ गुन्हे फसवणुकीचे

- नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी SIT कडून खरातला पुन्हा पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता

- नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

Pune: युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावर होत असलेला परिणामावर पुण्यात आज बैठक

पुणे -

युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावर होत असलेला परिणामावर पुण्यात आज बैठक

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन

बैठकीत उपाययोजनांवर होणार चर्चा

प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला राहणार उपस्थित

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीचे आयोजन

Navi Mumbai: तुर्भे येथील डंपिंग ग्राउंडला भीषण आग, परिसरात उडाली एकच खळबळ

नवी मुंबई -

नवी मुंबईतील तुर्भे येथील डंपिंग ग्राउंडमध्ये भीषण आग लागली असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

आग इतकी तीव्र आहे की तिचा धूर अनेक किलोमीटरपर्यंत पसरला, त्यामुळे आसपासच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून गेल्या दोन तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महत्वाचं म्हणजे सुमारे 15 दिवसांपूर्वीही याच ठिकाणी आग लागली होती, त्यामुळे प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com