SIT and forensic teams conduct a search operation at Ashok Kharat’s office in Nashik. saam tv
महाराष्ट्र

Ashok Kharat: पतीचा मृत्यू अटळ आहे, भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण; खरातविरोधात आणखी ११ महिलांची तक्रार

Ashok Kharat Case Update: अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अशोक खरातविरोधात आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पतीचा मृत्यू अटळ आहे अशी भीती दाखवत त्याने हे कृत्य केले.

Priya More

Summary -

  • अशोक खरातविरोधात आणखी ११ महिलांची तक्रार

  • एकूण तक्रारींची संख्या १९ वर पोहचली

  • एसआयटी, पोलिस आणि ईडीकडून तपास सुरू

  • भीती दाखवून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

अभिजीत सोनवणे, नाशिक

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातचे पाय आणखी खोलात गेले आहेत. त्याच्या विरोधात आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे खरातविरोधात महिलांच्या तक्रारींची संख्या १९ वर पोहचली आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी ११ महिलांनी खरात विरोधात पोलिसांत धाव घेतली.

भोंदू अशोक खरातने या महिलांना भीती दाखवली होती. पतीचा मृत्यू अटळ आहे तसंच कुटुंबियांच्या जीवाची भीती दाखवून नराधम खरातने त्यांच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देवाची ऊर्जा देण्याच्या नावाखाली भोंदू खरात महिलांचं शोषण करत होता. अशोख खरात प्रकरणाचा नाशिक पोलिस, एसआयटी आणि आता ईडीकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरातच्या कार्यालयात एसआयटीच्या पथकाने तपासणी केली. एसआयटीचे पथक मंगळवारी दोन वेळा खरातच्या कार्यालयात गेले होते. अशोक खरातची आज पोलिस कोठडी संपणार आहे. त्याला कोर्टात हजर करण्यापूर्वी एसआयटीच्या पथकाने त्याच्या कार्यालयाची झडती घेतली.

दरम्यान, भोंदू अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरात विरोधातील दुसऱ्या गुन्ह्यातील ७ दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरातविरोधात दाखल तिसऱ्या गुन्ह्यात आज एसआयटीकडून खरातच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटीकडून आज देखील ऑनलाईन व्हिसीद्वारे सुनावणीसाठी विनंती अर्ज केला जाणार आहे. न्यायालयाने विनंती अर्ज मान्य केल्यास ऑनलाईन व्हिसीद्वारे सुनावणी होईल. मात्र न्यायालयाने विनंती अर्ज अमान्य केल्यास खरातला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करून सुनावणी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

पुण्यात गुंडगिरीचं साम्राज्य, पोलीस झोपलेले, वसुलीच्या नावाखाली एजंटची गुंडगिरी

Crime: नगरपरिषदेत रक्तरंजित थरार! सभापती अन् कार्यकारी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या; डोक्यात गोळी घुसल्याने एकाचा मृत्यू

चहा पावडरमुळे किडनी फेल? केमिकलयुक्त चहा पावडर बाजारात?

SCROLL FOR NEXT