Nashik Accident Saam Digital
महाराष्ट्र

Nashik Accident : ब्रेक ऐवजी एक्सीलेटरवर पडला पाय, शिवशाही बसची ५ वाहनांना धडक; दोन वाहनांचा झाला चुराडा

Nashik Accident News : नाशिक त्र्यंबकरोड पिनॅकल मॉल जवळ शिवशाही बसने 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे. बस चालकाचा ब्रेकच्या जागी एक्सेलटर वर पाय पडला आणि ही दुर्घटना घडली आहे.

Sandeep Gawade

नाशिक त्र्यंबकरोड पिनॅकल मॉल जवळ शिवशाही बसने 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे. बस चालकाचा ब्रेकच्या जागी एक्सेलटर वर पाय पडला आणि ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपघातात दोन बाईक चक्काचुर झाला आहे. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिवशाही बस नाशिक त्र्यंबकरोड पिनॅकल मॉलजवळ आली असता बस चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र चुकून ब्रेकऐवजी एक्सीलेटर पाय पडला आणि बसचा वेग अचानक वाढला. यात समोरच्या पाच वाहनांना बसची धडक बसली. तर दोन दुचाकी बसखाली आल्या. दुचाकी बससोबत फरफटत केल्या.

सुदैवाने प्रसंगावधान राखत दुचाकीस्वार दुचाकीसोडून बाजूला झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक महिला गंभीर जखमी झाली आहे. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बसखाली अडकेल्या दुचाकी बाहेर काढल्या. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT