फैयाज शेख, साम टीव्ही
Nashik News : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी परिसरात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात (Accident) 2 महिला जैन साध्वींचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरुन दोन जैन महिला साध्वी पायी नाशिकच्या दिशेने जात होत्या. दरम्यान एका भरधाव कंटेनरने या महिलांना जोरदार धडक दिली. या धडकेच दोन्ही महिला साध्वीचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही महिला चातुर्मास करण्यासाठी नाशिकला पायी निघाल्या होत्या.
चालकाचं नियंत्रण सुटल्याने कंटेनर आधी पिकअप टेम्पोला आणि नंतर ओमनी कारला धडकला. त्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वी यांना धडक दिली. अपघातात ओमनी कारचंही मोठं नुकसान झालं आहे. (Live Marathi News)
समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) जालन्यातील दुधणवाडी गावाजवळ ट्रक आणि कार अपघात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात बोलेरो चालक मोहम्मद शाहरुख जखमी झाला आहे. तर त्याचा सहकारी अब्दुल कादिर मोहम्मद खलील शेख जागीच ठार झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.