Accident News
Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident : दिव्यांग महिलेला बसची जोरदार धडक; लांबवर नेलं फरफटत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तरबेज शेख

Nashik Accident News : नाशिकच्या द्वारका चौकात दिव्यांग महिलेस सिटीलिंक बसने जोरदार धडक दिली. इतकेच नाही तर या महिलेला १०० मीटर लांब फरफटत नेलं यात त्या गंभीर जखमी झाली आहे. महिलेस उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रेखा सकट असे जखमी महिलेचे नाव आहे. (Latest Marathi News)

महिला द्वारका चौकातून पायी रस्ता ओलांडत असताना आडगाव नाक्याकडून द्वारकाच्या दिशेने येणाऱ्या सिटीलिंक बसने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे सुमारे १०० मीटर महिला फरफटत गेली. चौकातील नागरिकांनी आरडा ओरड केल्यानंतर बस चालकाने बस थांबविल्याने सुदैवाने महिला बचावली.

या सर्व घटनेत निर्दयता आणि अस्ववेदनशीलताचे दर्शन घडून आले. भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले द्वारका भागातील बीट मार्शल त्यांना माहिती मिळताच त्या घटनास्थळी दाखल झाल्या. महिलेची परिस्थिती बघता चौकातील अनधिकृत रिक्षा थांब्यावर थांबलेल्या प्रत्येक रिक्षा चालकास महिलेस रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली. प्रत्येकाने नकार दिला.

शेवटी पोलिसांनी (Police) खिशातून पैसे काढत रिक्षा चालकास देत महिलेस रुग्णालयास घेऊन जाण्यास सांगितले. तरीदेखील त्यांनी नकार दिला. त्यांच्या या असंवेदनशीलतेने माणुसकीला काळीमा फासणारी वृत्ती समोर आली.

परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत येथील अनधिकृत रिक्षा थांबा हलविण्यात यावा, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या अनाधिकृत रिक्षा थांबल्यामुळे चौकात अधिक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन अपघात (Accident) होत असल्याचे सांगितले जाते आहे. शेवटी काही वेळानंतर रुग्णवाहिका आल्यांनतर महिलेस उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. भद्रकाली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

SCROLL FOR NEXT