Notice To Fisherman: समुद्रात जाळे टाकू नका, बंदर विभागाच्या नोटिसमुळे स्थानिक मच्छिमार आक्रमक

Port Department Notice : जाळ टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद
Navi Mumbai News
Navi Mumbai NewsSaam Tv

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : मुंबई ते नवी मुंबई प्रवास जलद आणि सुखकर व्हावा यासाठी जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र ही जलवाहतूक नवी मुंबई, उरण परिसरातील स्थानिक मच्छिमारांच्या उपजिवीकेवर घाला घालत आहे.

दिवाळे, मोहा, नाव्हा गावातील मच्छिमारांना महाराष्ट्र प्रादेशिक बंदर विभागाने मासेमारी करण्यासाठी टाकण्यात येणारे जाळे न टाकण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. जाळ टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद या पत्रात देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Navi Mumbai News
Solapur Crime : संतापजनक! अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागापोटी पीडित अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

यामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये (Fisherman) संतापाची लाट उसळली असून नोटीस मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. एकट्या दिवाळे गावात 225 नोंदणीकृत मच्छिमार सदस्य असून ते बेलापूर ते भाऊचा धक्का या भागात मासेमारी करत आपली उपजीविका करत आहेत. जाळे टाकण्यास मनाई केल्यास पारंपरिक उत्पन्नाच साधन बंद पडणार असून हा प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे.

Navi Mumbai News
Accident News : अहमदनगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर तिघेजण जखमी

चॅनल बनवताना मच्छिमारांना विश्वासात घेतले नाही. यासोबातच जलमार्गात या मच्छिमारांच्या जाळ्यांचा कुठलाही अडथळा येत नसताना देखिक नोटीस बजावण्यात आल्याने या प्रकरणी अधिवेशनात आवाज उचलणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी दिली आहे.

स्थानिक मच्छिमारांची जामीन गेली आता त्यांच्या पारंपरिक मासे विक्री व्यवसायावर देखील घाला घालण्यात येत असेल तर मच्छिमारांनी आपला उदरनिर्वाह कसरायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com