Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातून उड्या, धनगरांच्या ST आरक्षणाला आदिवासींचा विरोध

Assembly Election : नरहळी झिरवाळ आणि आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून उड्या मारल्या. सत्ताधारीआमदारांनीच असं आंदोलन केल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

आपल्या हक्कांसाठी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारणारे हे कोणी सामान्य नागरिक नाहीत... तर जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन करणारे हे आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आदिवासी आमदार हिरामण खोसकर, किरण लहामटे, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा.....धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नये, पेसा कायद्यानुसार आदिवासींची भरती करावी, या भूमिकेसाठी आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन केलंय.. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडालीय...

आदिवासी आमदारांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलं मात्र मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे आमदारांनी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या. त्यावेळी नरहरी झिरवळांचा रक्तदाब वाढला आणि त्यांच्या मानेलाही दुखापत झाली. या घटनेमुळे मात्र राजकारण तापलंय.

धनगर आणि धनगड एकच असल्याचे सांगत जीआर काढण्याच्या हालचाली सुरू केल्यानं आदिवासी समाज आक्रमक झालाय..तर मंत्री गिरीश महाजनांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय..सरकारने आश्वासन दिलं असलं तरी राज्यातील धनगर आणि आदिवासींची लोकसंख्या 7 ते 9 % धनगर समाजाची लोकसंख्या आहे तर

NT (C) मधून धनगर समाजाला 3.5 टक्के आरक्षणाची मागणी. तर आदिवासींची 9.5 % लोकसंख्या असून 7 % आरक्षणाची तरतूद आहे.

आदिवासी आणि धनगर आरक्षणाचा वाद पेटला असताना हा मुद्दा विधानसभेला किती प्रभावी

धनगर समाजाचा 30-35 मतदारसंघात प्रभाव

25 विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव

85 मतदारसंघात आदिवासी समाजाचा प्रभाव

धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नये, यासाठी आदिवासी समाजाने आरपारचा नारा दिलाय. तर धनगर समाजानेही रान पेटवलंय. त्यामुळे सरकारसाठी इकडे आड-तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT