Supriya Sule : राज्यातील हवा आता बदललेय ; हर्षवर्धन पाटील यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Supriya Sule On Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असून लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya Sule
Supriya SuleSaam Digital
Published On

इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर आज कार्यकर्तांच्या मेळाव्यात भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, राज्यात आता हवा बदलली आहे हे सरकार जाणार असल्याचा दावा केला आहे. २ जुलै पासून पवार साहेबांवर विश्वास ठेवून जो पक्षात राहिला त्याचा मान सन्मान नक्की होईल त्याची जबाबदारी माझी असेल पक्षात कोणावर अन्याय होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पाटील आणि पवार कुटुंबचं नात जुण आहे. आता पुन्हा आम्हाला एकत्र काम करायची संधी मिळत आहे. आता राज्यात हवा बडलली आहे, हे सरकार जाणार आहे २ जुलै पासुन पवार साहेबांवर विश्वास ठेवून जो पक्षात राहिला त्याचा मान सन्मान नक्की होईल त्याची जबाबदारी माझी असेल पक्षात कोणावर अन्याय होणार नाही, नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नरहरी झिरवाळ आणि आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून उड्या मारल्या, हा गंभीर प्रकार आहे. सत्तेत असणाऱ्या आमदारांना असं वाटणं याचा अर्थ हे सरकार जाण्याची वेळ आलेली आहे. मी सत्तेत असते तर राजीनामा दिला असता. अशा प्रकारच्या घटना म्हणजे सरकारच अपयश आहे. या सरकारला केवळ राजकारण करायचं आहे. आजचा दिवस राज्यासाठी काळा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Supriya Sule
PM Modi Thane Visit : PM नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; 56000 कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन, कसा असेल दौरा?

हर्षवर्धन पाटील केलं होतं कार्यकर्त्यांना आवाहन

हर्षवर्धन पाटील यांना ⁠आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की नाही घ्यायचा ? असे म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांकडून हो म्हणत घोषणा देण्यात आल्या. मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलं होतं. सिल्वर ओपन बैठक झाली. शरद पवार यांनी सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या, बाकीची जबाबदारी माझी राहील, असं म्हणत त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Supriya Sule
Ahilyanagar : अहमदनगर बनलं अहिल्यानगर, निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com