Narayan Rane Saam TV
महाराष्ट्र

Narayan Rane: नारायण राणे घेणार उद्धव ठाकरेंची भेट? कारणही सांगितलं...

संजय राऊतांविषयी काही गोष्टी सांगण्यासाठी ही भेट होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Narayan Rane: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. राऊतांनी दिलेलं ओपन चॅलेंज स्वीकारल्यावर आता राणे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. संजय राऊतांविषयी काही गोष्टी सांगण्यासाठी ही भेट होत आहे. (Latest Narayan Rane News)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, " राऊतांचे काय योगदान आहे. आजच्या राजकारणातले ते जोकर आहेत. शिव्या घालण्यापलीकडे काही करत नाहीत. काशीला आणि सारनाथला आमचा राम घेऊन चालला आहे. तिथे रामाचे कार्य चालू असताना रावणाचा उल्लेख कशाला?"

तसेच उद्धव ठाकरेंच्या भेटीवर बोलताना ते म्हणाले की, " मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे की, मी खासदार झाल्यावर संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याविषयी जे बोलायचे ते मी त्यांना सांगणार आहे. ते ऐकूण दोघांनी राऊतांना चपलेनं मारलं नायतर मला विचारा. मी आज ना उद्या माझं सर्व संरक्षण सोडणार आणि संजय राऊतांना भेटायला जाणार, " असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

संजय राऊत शिवसेना वाढवण्याचे नाही तर संपवण्याचे काम करत आहेत. त्यांना मातोश्रीला सुरूंग लावायचा आहे. ज्याव्यक्तीच्या खांद्यावर त्यांचा हात असेल तो खांदा गळलाच म्हणून समजा. माझं संरक्षण सोडून मी संजय राऊत यांना भेटणार, असं म्हणत राणेंनी राऊत यांनी केलेलं चॅलेंज स्वीकारलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

" शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय आहे. शिंदे गटात गेलेले सगळे चोर लफंगे आणि कचरा आहेत. कचऱ्यासमोर मुख्यमंत्री शिंदे भाषण करतात. राणे तुम्ही गुंड, तर मी महागुंड, कुठे येवू, मी कुणालाही घाबरणार नाही. कुठल्याही एजंन्सीला घाबरत नाही, " असे संजय राऊत म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tilache Ladoo : हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा रेसिपी

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

Parbhani Accident: कीर्तनाहून येताना भयंकर अपघात, ३ वारकर्‍यांचा जागीच मृत्यू, दत्ता महाराज मुडेकरांचं निधन

SCROLL FOR NEXT