Uday Samant : संजय राऊत यांना मंत्री उदय सामंत यांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले,'महिला भगिनींना...'

'शिंदे गट म्हणजे टोळी' अशी टीका खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केल्यानंतर मंत्री उदय सांमत यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिलं आहे.
Uday Samant News
Uday Samant News Saam Tv
Published On

Uday Samant News : ठाकरे गट आणि शिंदे गटामधील कटुता आणखी तीव्र होताना दिसत आहे. 'शिंदे गट म्हणजे टोळी' अशी टीका खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केल्यानंतर मंत्री उदय सांमत यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिलं आहे. 'महिला भगिनींचा अपमान करतात त्यांच्याकडून आम्ही आम्ही काय अपेक्षा करणार, अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. (Latest Marathi News)

Uday Samant News
Eknath Shinde: उद्धव ठाकरेंना पुन्हा दणका? ठाकरेंआधी शिंदेंकडून भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग?

आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं. चांदिवली विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटाच्या शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना मंत्री उदय सामंत म्हणाले, 'राजकारणासाठी कोणाही मराठी भाषेचा उपयोग करू नये ही माझी सर्वांना विनंती आहे. दिल्लीसमोर झुकण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला, हा देशातला प्रथम क्रमांकाचा उठाव होता. तो काही लोकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड होत असते. मराठी ही मातृभाषा विकसित झाली पाहिजे मुख्यमंत्री स्वतः कार्यरत आहे'.

Uday Samant News
Sanjay Raut: शिंदे गट म्हणजे टोळी, अशा टोळ्या गँगवॉर किंवा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारल्या जातात; संजय राऊतांची टीका

संजय राऊत यांच्यावर टीका करताना उदय सामंत म्हणाले,'मला यामध्ये काही नवीन वाटत नाह. गँगवॉर, कोथळा काढणे, आमच्या महिला भगिनींना वाईट पद्धतीने बोलणं. आम्हाला डुक्कर म्हणणं गटारीतली घाण म्हणणं मुडदे पाडणे, आमचे पोस्टमार्टम करणे हे आम्हाला नवीन नाही'. तर 'जनता महाराष्ट्रातील बघत आहे. जे महिला भगिनींचा अपमान करतात. त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करणार, असा सवाल उदय सामंत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com