Nitesh Rane : संघाच्या रेशीमबागेत नितेश राणे शांतच दिसले; संवाद न साधताच निघून गेले, नेमंक काय घडलं?

नितेश राणे यांनी आज रेशीम बागेत जात संघाची परंपरा जोपासली.
Nitesh Rane
Nitesh RaneSaam tv

Nitesh Rane News : नितेश नारायण राणे...राजकारणात नेहमीच चर्चेत असलेले हे नाव..प्रसार माध्यमामध्ये नेहमीच चर्चेत असणारे व्यक्तिमत्व अशी नितेश राणेंची ओळख. हिवाळी अधिवेशनात देखील सभागृहात आणि सभागृहाबाहेर नितेश राणे यांचे आक्रमक रूप पहायला मिळाले. (Latest Marathi News)

Nitesh Rane
Ajit Pawar : 'देवेंद्र फडणवीसांना साडे चार वर्ष मुख्यमंत्री राहून...'; अजित पवारांचा अधिवेशनात गौफ्यस्फोट

हिंदुत्व, लव्ह जिहादचा मुद्दा असो वा दिशा सालीयन प्रकरण असो नितेश राणे त्यांच्या राणे स्टाईलमध्ये प्रहार करतात. हिवाळी अधिवेशनात देखील दिशा सालीयन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या नितेश राणे यांनी सडकून टीका केली होती आणि ज्याच्या हेडलाइन दिवसभर माध्यमामध्ये झळकत होत्या. मात्र याच नितेश राणे यांनी आज, मंगळवारी रेशीम बागेत जात संघाची परंपरा जोपासली.

रेशीम बागेत सर्व भाजप आमदाराना बोलावण्यात आले होते. विधानसभा व विधानपरिषद मिळून ११३ आमदारांनी यावेळी उपस्थिती लावली होती. मात्र नेहमीच माध्यमांना सहज प्रतिक्रिया देणारे नितेश राणे आज देखील रेशीमबागेत प्रतिक्रिया देतील असे सर्व माध्यम प्रतिनिधींना वाटले होते.पण नितेश राणेंनी प्रतिक्रिया देणे टाळले.

Nitesh Rane
Shambhuraj Desai: मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार, पण...'; शंभूराज देसाईंचं विरोधकांच्या घोटाळ्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण

...म्हणून नितेश राणेंनी प्रतिक्रिया देणे टाळले

प्रसारमाध्यमांशी बोलताना बेधडक बोलणारे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रेशीमबागेत संयमी भूमिका घेतील. रेशीम बागेत पत्रकारांनी नितेश राणे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संघस्थानी बोलणे योग्य होणार नाही. तसेच ती येथील परंपरा नाही, असे सांगत नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास निकार दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com