narayan rane will lose in ratnagiri sindhudurg lok sabha constituency says vaibhav naik  saam tv
महाराष्ट्र

Konkan Political News : काेकणची जनता 'त्या' गाेष्टी विसरली नाही, नारायण राणेंचा पराभव अटळ : आमदार वैभव नाईक

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री आहेत. पक्षाचं अस्तित्व नसल्याचे केसरकरांना मान्य झाल्याचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg Political News :

आगामी काळातील लाेकसभा निवडणुकीच्या (loksabha election 2024) पार्श्वभूमीवर काेकणातील राजकारण तापू लागलं आहे. शिवसेना नेते शिक्षणमंत्री दिपक केसरकर (deepak kesarkar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे (ratnagiri-sindhudurg lok sabha constituency) उमेदवार असतील असे नुकतेच संकेत दिले. त्यावर आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी केसरकर यांना गद्दार असा टाेला लगावत काेकणी जनता काही विसरत नाही. काही करा नारायण राणेंचा पराभव अटळ असल्याचे म्हटले.  (Maharashtra News)

आमदार वैभव नाईक म्हणाले राणेंचा दहशतवाद पुढे आणणारे केसरकर आज राणेंचा दहशतवाद विसरले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री असताना आपल्या पक्षाचं अस्तित्व नसल्याचे त्यांनी मान्य केले आणि म्हणून नारायण राणेंची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्याचा प्रयत्न केसरकर यांनी केल्याचे नमूद केले.

नाईक म्हणाले यापूर्वी दिपक केसरकर यांनी वेळावेळी राणेंच्या दहशतीविषयी खूलेआम चर्ची केली आहे. राणे पालकमंत्री असताना त्यांनी केसरकर यांनी नियाेजन समितीच्या बैठकीतून बाहेर काढले हे केसरकर विसरले असतील परंतु जनता नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसरीकडे कोकणी जनतेने नारायण राणे व दिपक केसरकर यांच्या गद्दारीचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही उमेदवार दिला तरी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत (vinayak raut) हे भरघोस मतांनी निवडून येतील, लोक तुम्हाला जागा दाखवतील असे नाईक यांनी केसरकरांसह नारायण राणेंना आव्हान दिले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Erandol Vidhan Sabha : निवडणूक न लढविल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज; एरंडोल मतदारसंघातून ६० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामा

Metastatic breast cancer: ब्रेस्ट कॅन्सरच्या चौथ्या टप्प्याबाबत असलेले गैरसमज, काय आहे नेमकं तथ्य?

Hyderabad Tourist Places: हिवाळ्यात मित्रमैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करताय? मग हैदराबादच्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

WTC Scenario: भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा WTC Final मध्ये भिडणार? टीम इंडियाला करावं लागेल हे एकच काम

Devlali Vidhan Sabha : देवळाली मतदारसंघात महायुतीमध्ये वादाची ठिणगी; भूमिका स्पष्ट करण्याबाबत सरोज अहिरे यांची शिंदेंकडे विनंती

SCROLL FOR NEXT