Narayan Rane Criticism Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Narayan Rane: संजय राऊत मूर्ख माणूस, निंदा नालस्ती करणं हे त्यांचं काम; खासदार नारायण राणेंची टीका

Narayan Rane Criticism Sanjay Raut: अर्थसंकल्प समजून घ्यायला ७२ तास लागतात. त्याआधी पंतप्रधान मोदींना अर्थसंकल्प समजला कसा असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

Bharat Jadhav

अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना भाजप खासदार नारायण राणे यांनी सणसणीत उत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा संजय राऊत हे मूर्ख माणूस असल्याची टीका राणेंनी केलीय. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला चौदाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणले, ते अर्थव्यवस्था समजत नाही म्हणून आणलं का? एका बंद खोलीत टीका करणं, निंदा नालस्ती करणं, हा संजय राऊत यांचा गुण आहे. त्यांच्या कोणत्याही टीकेची दखल घेऊ नये, असं म्हणत नारायण राणे यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

अर्थसंकल्प हा गरीब लोकांसाठी आहे, त्यातून मध्यमवर्गीयांच्या खिश्यात पैसा खेळता राहील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदींच्या या विधानावरून संजय राऊत यांनी टीका केली. अर्थसंकल्प समजून घ्यायला ७२ तास लागतात, त्याआधी त्यांना अर्थसंकल्प कसा समजला कसा? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून उत्तर देतांना खासदार नारायण राणे यांनी राऊतांना सणसणीत टोला मारलाय.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा दिला. अर्थमंत्र्यांनी १२ लाखांच्या कमाईवर कोणताच कर लागणार नाही अशी घोषणा करत मध्यमवर्गींयांना दिलासा दिला, पण त्याचवरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. सरकारने १२ लाख रुपयांच्या कमाईवर करची सवलत दिली खरी पण १२ लाख रुपये कसे आणावेत? असा सवाल संजय राऊत यांनी केली होता.

लोकसभेत सादर करण्यात आलेला बजेट हा मध्यमवर्गीयांसाठी असल्याचं सत्ताधारी म्हणातात. पण सरकारने त्यांच्यासाठी काय केलं? देशातील महागाई कमी करण्यासाठी काय उपाय योजना आणली? उद्योग धंदे वाढवण्यासाठी काय उपाय योजना आणली असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. महागाई आणि देशातील बेरोजगारी कमी होणार नसेल किंवा ते कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या नसतील तर मध्यमवर्गीयांच भलं कसं होणार? डॉलरच्या तुलनेत रुपया खाली आलाय.

रुपया मजबूत करण्यासाठी कोणत्याच उपाय योजना नाहीत. मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचं सांगितंल जातं. पण त्यांच्यासाठी कोणती योजना आणण्यात आली. १२ लाख रुपयांचा स्लॅबसाठी कोणताही कर लागत नाही, असं म्हटलं जातं परंतु १२ लाख रुपये कोणाकडे आहे. ते बारा लाख रुपये आणायचे कसे, असा सवाल संजय राऊत यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT