Nandurbar Vishal Patil Indian Army Success Story Saam TV
महाराष्ट्र

Farmer's Son Success Story: शेतकरी पुत्राची कमाल, सैन्य दलात बनला अधिकारी; देशात पटकावला तिसरा क्रमांक

Nandurbar Vishal Patil Success Story: जिद्द आणि चिकाटी असली, की या जगात काहीच अशक्य नाही असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नंदुरबार जिल्ह्यातून आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे, साम टीव्ही

Nandurbar Vishal Patil Success Story: जिद्द आणि चिकाटी असली, की या जगात काहीच अशक्य नाही असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नंदुरबार जिल्ह्यातून आला आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना देखील एका शेतकऱ्याच्या मुलाने कठोर परिश्रम घेत आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील आसाणे गावातील विशाल निंबा पाटील यांची भारतीय सैन्यदलाच्या इंजिनिअरिंग फोर्समध्ये निवड झाली आहे. या परीक्षेसाठी भारतात फक्त सातच जागा होत्या. यामध्ये विशाल पाटील हे देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

विशाल पाटील यांच्या कुटुंबाच्या शेतीवर उदरनिर्वाह होता, मात्र आसाणे गाव हे दुष्काळग्रस्त भागात मोडलं जातं. त्यामुळे पाटील यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. परंतु शिक्षणाची जिद्द असल्याने आपला गाव सोडून जळगाव (Jalgaon) या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलं.

शिक्षण घेत असताना विशाल पाटील यांनी शेतीच्या कामात देखील वडिलांना मदत केली. याशिवाय कठोर परिश्रम घेत भारतीय सैन्यदलाची (Indian Army) परीक्षा दिली आणि घवघवीत यश मिळवलं. विशेष बाब म्हणजे, संपूर्ण भारतातून घेण्यात आलेल्या या इंजिनिअरिंग परीक्षेत केवळ सातच जागा होत्या.

या सात जागांमध्ये विशाल पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. बापाने काबाड कष्ट करून शिकवलेल्या मुलाने घवघवीत यश मिळवल्यानंतर गावातील नागरिकांनी पेढे वाटत आनंद साजरा केला. विशाल पाटील यांच्या यशाचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT