Odisha Train Collision: अंगावर जखमांचे व्रण नाही, कुठलीही गंभीर दुखापत नाही; मग ४० प्रवाशांच्या मृत्यूचं कारण काय?

Coromandel Train Accident: संपूर्ण देशाला हादवून टाकणाऱ्या ओडिशा ट्रेन अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत.
 Odisha train Collision Big Updates coromandel express Accident shocking information 40 Passengers died due to electrocution
Odisha train Collision Big Updates coromandel express Accident shocking information 40 Passengers died due to electrocution Saam TV
Published On

Coromandel Train Accident: संपूर्ण देशाला हादवून टाकणाऱ्या ओडिशा ट्रेन अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी सुरू असून यामध्ये नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. (Latest Marathi News)

ट्रेन अपघातानंतर अनेक प्रवाशांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. रेल्वे ट्रॅकवर मृतदेहांचा अक्षरश: खच लागला होता. कुणाचा हात तर कुणाचे पाय गायब होते. धक्कादायक बाब म्हणजे यातील ४० प्रवाशांच्या मृतदेहावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत.

 Odisha train Collision Big Updates coromandel express Accident shocking information 40 Passengers died due to electrocution
Bihar Crime News: संतापजनक! लग्नासाठी माहेरी आलेल्या विवाहितेवर घरात घुसून बलात्कार, २४ वर्षीय तरुणाला अटक

कोरोमंडल एक्सप्रेस, (Coromandel Express Accident) हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीमध्ये झालेल्या या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र, ओडिशा सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार या अपघातात २७५ प्रवाशी मृत्युमुखी पडले असून काही मृतदेहांची दोनदा मोजणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी झालेला हा अपघात इतका भीषण होता, की ट्रेनचे डब्बे (Train Accident) उडून ट्रॅकवर इतरस्त्र पडले. त्यामुळे प्रवासी एका झटक्यात बाहेर फेकले गेले. यामुळे अनेकांना जबर मार लागला. काहींचे हातपाय तुटले तर काहीजण रक्ताच्या थारोळ्यात पडले.

काही मृतदेहांची अवस्था अशी होती, की त्यांची लवकर ओळख पटवता आली नाही. अशातच सर्वांनाच थक्क करणारी बाब म्हणजे रेस्क्यू टीमला ४० प्रवाशांचे मृतदेह असे सापडले, की ज्यांवर कोणत्याही प्रकारचा व्रण नव्हता. मग, असे असताना त्यांचा मृत्यू कसा झाला असेल? असा प्रश्न विचारला जात आहे.

 Odisha train Collision Big Updates coromandel express Accident shocking information 40 Passengers died due to electrocution
Nashik Accident News: भरधाव टिप्परने कारला उडवलं, देवदर्शनाहून परतणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी

४० प्रवाशांच्या मृत्युचे कारण काय?

रेल्वे पोलिसांनी (Police) या ४० प्रवाशांच्या मृत्यूमागचे कारणही शोधून काढले आहे. वीजेच्या धक्क्यामुळे या प्रवाशांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे प्रकरण हाताळणाऱ्या पोलिसांनी ही बाब निदर्शनास आणली आहे.

पोलिसांच्या अंदाजानुसार, जेव्हा या तिन्ही ट्रेन एकमेकांवर आदळल्या. त्यावेळी ओव्हरहेड वायर तुटल्या. या वायरमध्ये अतिउच्चदाबाचा वीजप्रवाह सुरू असतो. त्यामुळे या वायरचा संपर्क ट्रेनसोबत आला असावा. परिणामी याचा शॉक प्रवाशांना बसला असेल, म्हणून या ४० प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com