Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिला ताटकळल्या, e-KYC साठी महिला रात्रभर रांगेत; नंदुरबारमधील विदारक चित्र

Nandurbar News : लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते असलेल्या बँकेत ई- केवायसी करावी लागत आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र आदिवासी भागात बँकांची संख्या कमी असल्याने मोठ्या रांगा लागत आहेत. ग्रामीण भागातून येऊन काम होत नसल्याने आणि दररोज येण्याजाण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने घरून भाकरी बाधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर मुकामी थांबत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

सरकारने एखादी योजना आणताना संपूर्ण यंत्रणा उभारावी. तसेच गावपातळीवर उपाय योजना करणे अपेक्षित (Nandurbar) आसताना आदिवासी भागातील महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने उपाय योजना करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसून येत नसल्याने साधारण मागील महिन्यापासून बँकांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे. 

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते असलेल्या (Bank) बँकेत ई- केवायसी करावी लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बँकेची खाते उघडली आहेत. मात्र केवायसी नसल्याने आता केवायसी करण्यासाठी बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लागत आहे. मात्र बँकांमध्ये होणारी गर्दी मोठी असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. दरम्यान दररोज येऊन परत जाने आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने अनेक महिलांनी आणि त्यांचा नातेवाईकांनी बँकेच्या बाहेर मुकामी राहण्याचा पर्याय निवडलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT