Shahada Police Station Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : राजकारणात भाग घेतो अन् फटाके फोडतो म्हणून एकाला मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Nandurbar News : लोकसभा निवडणूक निकाल तसेच त्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवेळी लोणखेडा येथील काहींनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात एका गटातील सहा जणांनी युवकावर हल्ला करून जखमी केले आहे. शनिवारी रात्री चारचाकीतून आलेल्यांनी चौफुलीवर दहशत निर्माण करत ही मारहाण केली. गावातील राजकारणात भाग घेतो अन् फटाके फोडतो या कारणातून ही मारहाण करण्यात आली. 

लोकसभा निवडणूक निकाल तसेच त्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवेळी लोणखेडा येथील काहींनी फटाके फोडून आनंद (Nandurbar) व्यक्त केला होता. यात गणेश ऊर्फ प्रीतम शांतीलाल पाटील याचा समावेश होता. दरम्यान गणेश पाटील हा त्याचा मित्र जितेंद्र राजू ठाकरे याच्यासोबत लोणखेडा चौफुलीवरील पानटपरीजवळ गप्पा करत उभे होते. याचवेळी वाहनातून आलेल्या सहा जणांनी गणेश पाटील याला धमकावत वाद घालण्यास सुरुवात केली. (Shahada) गणेश पाटील प्रतिकार केला असता, तू राजकारणात भाग घेतो, फटाके फोडतो, असे सांगून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. 

सदरच्या प्रकारात मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात असून मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपस सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: बायकांनो! नवऱ्यापासून 'या' ४ गोष्टी लपवणं आहे शहाणपणाचं काम; नाहीतर सुखी संसारात येईल दु:ख

Maharashtra Live News Update:नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

Political News : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा पक्षाला रामराम, भाजपमध्ये केला प्रवेश

Fat Loss: जेवणात १३ गोष्टींचा समावेश करून, मुलीने ८ महिन्यांत कमी केले ३० किलो वजन

IND vs AUS: 'माहिती नाही आम्ही पुन्हा येणार...' सामना जिंकल्यानंतर रोहितनं दिले निवृत्तीचे संकेत

SCROLL FOR NEXT