Navegaon- Nagzira : नवेगाव- नागझिरा जंगल सफारी ३० सप्टेंबरपर्यंत बंद

Bhandara News : नवेगाव- नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने येथे वाघांचा अधिवास असल्याने वाघांसह वन्य प्राण्यांचे दर्शन होत असते.
Navegaon- Nagzira
Navegaon- NagziraSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचा अधिवास असलेले नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी आता पुढील तीन महिन्यासाठी बंद करण्यात आले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत अशी तीन महिन्यांपर्यंत इथली जंगल सफारी आता बंद राहणार आहे. 

Navegaon- Nagzira
Akola News : नव्या कायद्यानुसार अकोल्यात पहिला गुन्हा दाखल; पोलिसांनी घेतले ताब्यात

नवेगाव- नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने येथे वाघांचा अधिवास असल्याने वाघांसह वन्य प्राण्यांचे दर्शन होत असते. यामुळे परतक येथे मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र सध्या पावसाळ्याला सुरुवात झालेली असून पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच अंतर्गत व्यवस्थापनाच्या दृष्टीने दरवर्षी हे तीन महिन्याकरिता बंद करण्यात येत असते. शिवाय जंगलातील अंतर्गत रस्ते पर्यटकांची वाहने या मार्गावरून चालविणे जिकरीचे असतात. 

Navegaon- Nagzira
Chandwad News : चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; कृषीदिनी सुरू केले कांदा क्रांती आंदोलन

आता काही पर्यटकांनी १ जुलैनंतर ऑनलाइन बुकिंग केली आहे. त्यांचे पैसे परत करण्याबाबत नवेगाव- नागझिरा (Jungle safari) व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडून आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. त्यासोबतच पुढील आदेशापर्यंत जंगल सफारी पूर्ण बंद ठेवण्यात येईल; असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता वन्यप्रेमीना  जंगल सफारीसाठी 3 महीने वाट पहावी लागणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com