Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : नंदुरबारमधील 'त्या' कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; अतिक्रमणवर नगरपालिकेचा हातोडा, साम टीव्हीच्या बातमीनंतर दणका

Nandurbar News : रस्त्यावरून जाणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होता महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सुरू असलेल्या कुंटणखान्याबाबत बातमी साम टीव्हीने काही दिवसापूर्वी प्रसारित केली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या अवघ्या ३०० मीटर हद्दीत असलेल्या मुख्य रस्त्यांवर अवैधपणे देहविक्रीचा काळा धंदा सुरू होता. याबाबतची बातमी 'साम टीव्ही'ने प्रसारित केल्यानंतर नगरपालिका व पोलीस प्रशासनाला जग आली असून अवैधपणे चालविण्यात येत असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे.

नंदुरबार शहरातील नामांकित असलेल्या मोठ्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी ज्या भागातून ये- जा करतात. याच भागातील रस्त्यावर अवैधपणे कुंटणखाना चालविण्यात येत होता. यामुळे अनेक रस्त्यावरून जाणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सुरू असलेल्या कुंटणखान्याबाबतची बातमी साम टीव्हीने काही दिवसापूर्वी प्रसारित केली होती. याची दखल घेण्यात आली. 

पोलिसांनी टाकली धाड 

महाविद्यालय, शाळा परिसरापासून काही अंतरावर कुंटणखाना चालविला जात होता. इतकेच नाही तर आजूबाजूच्या परिसरात भाजीपाला मार्केट व बसस्थानक देखील आहे. यामुळे या भागात नेहमीच वर्दळ असल्याचे पाहण्यास मिळत होते. मात्र नंदुरबार शहरात अवैधपणे चालविण्यात येत असलेल्या कुंटणखान्यावर आज पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. यामुळे आता येथे चालत असलेले देहविक्रीचा व्यवसाय बंद पाडला आहे.  

अतिक्रमणावर चालविले जेसीबी 

नंदुरबार शहरातील महाविद्यालयाकडे जाणारा रस्त्यांवर अवैधरीत्या चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिस प्रशासन व नंदुरबार नगरपालिका यांनी संयुक्त कारवाई केली आहे. बसस्थानक परिसरात चालणाऱ्या कुंटणखाण्याच्या अतिक्रमणावर नगरपालिकेने जेसीबी चालवीत येथे असलेले घरे जमीनदोस्त केले आहेत. आजच्या या कारवाईमुळे विद्यार्थी व महिलांना होणारा त्रास थांबणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT