Nandurbar Zp School : आदिवासी विद्यार्थ्यांचे अफलातून टॅलेंट; नंदुरबारच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी लिहितात दोघा हातांनी

Nandurbar news : शाळेतील मुलांकडे शिक्षक लक्ष देत नाही. शिक्षक नीट शिकवत नाहीत; अशी ओरड कायम पाहण्यास मिळते. मात्र नंदुरबारसारख्या आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा याला अपवाद ठरत आहे
Nandurbar Zp School
Nandurbar Zp SchoolSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेले टॅलेन्ट क्वचितच पाहण्यास मिळते. त्यात आदिवासी भागातील मुलांना फारसे शिक्षण व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे फारसे ज्ञान नसते असे म्हटले जाते. परंतु नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आम्ही कोणापेक्षा कमी नाही हे दाखवून दिले आहे. नंदुरबारच्या आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी चक्क दोन्ही हातांनी पाढे, बाराखडी, इंग्रजी, मराठी शब्द लिहत असल्याचे अफलातून टॅलेंट समोर आले आहे.

सध्या इंग्रजी शाळांमध्ये शिक्षणासाठी पालक, विद्यार्थ्यांची धडपड सुरु आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता घसरत असल्याची चर्चा कायम आहे. शाळेतील मुलांकडे शिक्षक लक्ष देत नाही. शिक्षक नीट शिकवत नाहीत; अशी ओरड कायम पाहण्यास मिळते. मात्र नंदुरबारसारख्या आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा याला अपवाद ठरत आहे. येथे कार्यरत शिक्षकांमुळेच हे शक्य होत असल्याचे बोलले जात आहे.

Nandurbar Zp School
Sambhajinagar Zp School : शाळेत येताना शिक्षकाला खड्ड्यांचा त्रास; फावडे, टोपली घेऊन खड्डे बुजवायला विद्यार्थ्यांनाच जुंपले

नंदुरबारच्या आठशे लोकसंख्या असलेल्या बालआमराई गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत येथील विद्यार्थी मराठी, इंग्रजी अथवा गणित असा कोणताही विषय असला तरी दोन्ही हातांनी ते लिहितात. 'थ्री इडीयटस्' या चित्रपटात अभिनेता बोमन इराणी यांनी फळ्यावर दोन्ही हातांनी लिहल्याचे पाहिले आहे. हा चित्रपट पाहतांना कोणी विचार केला तर कि हे वास्तवात होवू शकते. शाळेतील विद्यार्थी फळ्यावर देखील तेवढेच सुंदर, सुवाच्च अक्षर एकाचवेळी दोन्ही हातांनी गिरवतात. अफलातून टॅलेंट नंदुरबार तालुक्यातील बालआमराई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत. 

Nandurbar Zp School
Wedding Invitation card : आगळीवेगळी लग्न पत्रिका..सोबत आले सीड बॉल; लग्न पत्रिकेतून पर्यवरणाचा संदेश

उलटी उजळणीही सहज म्हणतात 

शाळेत पहिली ते चौथीचे चार वर्ग असून ३० इतकीच पटसंख्या आहे. याठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, येथील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही लाजवतील असे इंग्रजीचे वाचन करतात. तर गणितातील ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ आहेत. उलटी उजळणी करण्यात चिमुकल्यांचा सराव आहे. शाळेत विशेष आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची यांची तऱ्हाहि वेगळीच आहे. इंग्रजी वाचन अस्खलित आणि स्पष्ट. हे अफलातून टॅलेंट पाहून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी कमी नाहीत, असेच म्हणावे लागेल. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com