Nandurbar Accident: 18-year-old Nilesh Varsale Dies In Shahada Car-bike Collision 
महाराष्ट्र

Nandurbar Accident: घरापासून अवघे दोन किलोमीटर अंतर, पण...; भरधाव कारने १८ वर्षीय तरुणाचा जीव घेतला

Nandurbar Road Accident: नंदुरबारच्या शहादा-खेतिया रस्त्यावर सुलतानपूर फाट्याजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ब्राह्मणपुरी येथील १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

Bharat Jadhav

  • नंदुरबार जिल्ह्यातील शहादा-खेतिया रस्त्यावर भीषण अपघात

  • सुलतानपूर फाट्याजवळ भरधाव आर्टिगा कारने दुचाकीला मागून धडक

  • या अपघातात ब्राह्मणपुरी येथील १८ वर्षीय निलेश विनोद वरसाळेचा मृत्यू

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

शहादा-खेतिया रस्त्यावर सुलतानपूर फाट्याजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची भीषण अपघात घडला. या अपघातात ब्राह्मणपुरी येथील १८ वर्षीय निलेश विनोद वरसाळे याचा जागीच मृत्यू झाला. काम आटोपून घरी परतत असताना निलेशवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश वरसाळे हा खेतिया येथे सलूनचे काम आटोपून दुचाकीवरून आपल्या ब्राह्मणपुरी गावाकडे परतत होता. गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानपूर फाट्याजवळ हा अपघात झाला. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या आर्टिगा कारने निलेशच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेत निलेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, त्याचा जागीच मृत्यू झाला. घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाल्याने परिसरात शोककळा पसरलीय. दरम्यान, कार चालक गौतम मगन पाटील हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. अपघातानंतर ग्रामस्थांनी जखमी कार चालकाला पकडले. दरम्यान पोलिसांनी निलेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहादा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याच्या कथित प्रकारामुळे एका १८ वर्षीय तरुणाचा जीव गेल्याने संताप व्यक्त केला जातोय. या घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा आणि मद्यपान करून वाहन चालवण्याच्या गंभीर परिणामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

गुजरातमधील भीषण अपघातात तीन लहान मुलांसह ७ जणांचा मृत्यू

भुज-खवडा राष्ट्रीय महामार्गावर खवडा परिसराजवळ कार आणि ट्रेलरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. अपघातातील मृत हे आर्मी कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेसेजचा रिप्लाय येण्यास उशीर झाला की मनाची तळमळ का होते? जाणून घ्या या मागील मानसशास्त्र

Transfer News : पोलिस दलात मोठा फेरबदल; १४४ पीपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mens Mental Health : घराचा आधार असलेले पुरुष आतून का तुटतात? भावना लपवण्याचे तोटे नक्की वाचा

Sendha Salt vs Regular Salt: साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरताय? बीपी आणि स्ट्रोकचा धोका किती कमी होतो, पाहा सविस्तर

Maharashtra News Live Update: पुण्यात मेट्रो ऐन प्रवासात बंद! प्रवाशांना थेट मेट्रो पुलावर उतरवले; पाहा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT