Prakasha News saam tv
महाराष्ट्र

Prakasha News : प्रकाशाच्या मुख्य केदारेश्वर मंदिरात चोरी; ५० किलो वजनाची दानपेटी लांबविली, रक्कम काढून फेकली दानपेटी

Nandurbar News : दक्षिण काशी तीर्थक्षेत्र असलेल्या प्रकाशा येथील केदारेश्वर हे मुख्य मंदिर आहे. याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. पुढील वर्षी नाशिक येथे कुंभमेळा असल्याने प्रकाशा येथे तयारी सुरु आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथील मुख्य केदारेश्वर मंदिराचा गाभाऱ्यात असलेली दानपेटी चोरांनी उचलून नेली. यानंतर मंदिराच्या मागील बाजूस सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर फेकलेली आढळून आली आहे. त्या दानपेटीत किती रक्कम होती, हे सांगणे अशक्य असले तरी महाशिवरात्रीनंतर दानपेटी उघडली नव्हती असे समजते. यामुळे त्यात लाखो रुपये असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 


दक्षिण काशी तीर्थक्षेत्र असलेल्या प्रकाशा येथील केदारेश्वर हे मुख्य मंदिर आहे. याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. पुढील वर्षी नाशिक येथे कुंभमेळा असल्याने त्या अनुषंगाने प्रकाशा येथे देखील तयारी सुरु आहे. येथील केदारेश्वर या मुख्य मंदिराला तीन दरवाजे आहेत. दोन समोरून तर एक उजव्या बाजूने आहे. उजव्या बाजूच्या लहान दरवाज्यातून चोरांनी कुलूप तोडत मंदिर सभा मंडपात प्रवेश केला व नंदीच्या मागील बाजूस असलेली व लोखंडी साखळणे बांधलेली सुमारे ४५ ते ५० किलो वजनाची लोखंडी दानपेटी उचलून नेली.

मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तोडले 

एवढेच नव्हे तर चोरांनी मंदिराच्या बाहेर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडल्याचे दिसून आले आहे. सदर घटना कळताच मंदिर समितीचे सुरेश पाटील यांनी मंदिरावर धाव घेतली. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत आजूबाजूस तपास केला. मात्र काही आढळून आले नाही

दानपेटी लाखोंची रक्कम 
दरम्यान मंदिराची दानपेटी खदान मध्ये पडली असल्याची माहिती मंदिर ट्रस्टींना कळाली. यानंतर पोलीस व मंदिर ट्रस्टचे संचालक सुरेश पाटील गेले असता फोडलेल्या अवस्थेत दानपेटी आढळून आली. त्या दानपेटीमध्ये किती रक्कम होती हे सांगणं अशक्य आहे. मात्र महाशिवरात्रीनंतर दानपेटीला उघडण्यात आले नव्हते, अशी माहिती मिळत आहे. अर्थात दानपेटीत असलेली रक्कम लाखोंवर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT