सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपासून परतीचा जोरदार पाऊस होत आहे. यात हवामान विभागाकडून जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागात कालपासून पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे चांदसैली घाटात दरड मोठ्या प्रमाणात कोसळली असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
राज्यातील बहुतांश भागात परतीच्या पाऊस सुरु आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात देखील मागील दोन- तीन दिवसांपासून पावसाचे रोज आगमन होत आहे. शिवाय दिवसभर ढगाळ वातावरण राहत असून हवेत देखील मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव व धुळे या चारही जिल्ह्यात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर नंदुरबार जिल्ह्याला पुन्हा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
चांदसैली घाट रस्ता बंद
नंदुरबार जिल्ह्यात सततच्या पावसामुळे चांदसैली घाटातील सातपायरी वळणार दरड कोसळली आहे. उंच शिखर वरून दगडाचा भला मोठा खच रस्त्यावर आल्याने घाट मार्ग बंद झाला आहे. परिणामी धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या चांदसैली घाट बंद झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक वाहने घाटात अडकली आहेत. दरड रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नसल्याने वारंवार दरड कोसळण्याचे प्रकार होत आहेत.
शनिमाडळ परिसरात मुसळधार पाऊस
नंदुरबार तालुक्यातील शनिमाडळ गावात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरीचे कादा रोप, कापुस, मका, कांदा या सारख्या अन्य पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.