सागर निकवाडे
नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या नर्मदा काठावरील तीनसमाळ गावात तीव्र पाणी टंचाई जाणविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे परिसरातील तीनसमाळ गावातील महिलांना पाण्यासाठी (Nandurbar) तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. घाट रस्त्यातून महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे वास्तव पाहण्यास मिळत आहे. (Breaking Marathi News)
नंदुरबार जिल्ह्यातील या अतिदुर्गम भागात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये पाणी टंचाईच्या झळा (Water Crisis) तीव्र झाल्या आहेत. या भागात पाण्याचे स्त्रोत नसल्याने झऱ्याच्या पाण्यावर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे. त्या ठिकाणीही पाणी कमी असल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवसभर बसून रहावे लागत असल्याची स्थिती आहे. प्रशासनाच्या वतीने उपाय योजना करणे गरजेचे आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष
एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्याचसोबत जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी आदेश दिल्याचे सांगितले असले तरी जिल्ह्यात ज्या भागात पाणी टंचाई जाणवत आहे. त्या ठिकाणी उपाय योजना होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकमंत्र्याचा आदेश प्रशासन लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.