Nandurbar news Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : रस्त्यावर झाडाची फांदी कोसळली; मोटारसायकलवरून जाणाऱ्या आईसह मुलाचा मृत्यू

Nandurbar news : वादळी वारा असल्याने झाडे उन्मळून पडण्याची किंवा फांद्या तुटण्याची शक्यता अधिक असते. यामुळे मागील काही दिवसात अशा घटना घडली काहीजण जखमी झाले आहेत अशीच घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात वारा आणि पाऊस होत आहे. यात जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडाची मोठी फांदी तुटून पडली. याच वेळी रस्त्याने मोटारसायकलवर फांदी पडल्याने डोक्याला मार लागून महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या मुलाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदरची घटना नंदुरबार ते खांडबारा मार्गावर बालअमराई फाट्याजवळ घडली आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा येथील रहिवासी दीपा गावित असे घटनेत मृत महिलेचे नाव आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. यात वादळी वारा असल्याने झाडे उन्मळून पडण्याची किंवा फांद्या तुटण्याची शक्यता अधिक असते. यामुळे मागील काही दिवसात अशा घटना घडली काहीजण जखमी झाले आहेत. अशीच घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली असून प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच धोकेदायक झाडांच्या फांद्या कापल्या असत्या, तर हा दुर्दैवी अपघात टाळता आला असता अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मोटारसायकलवरच कोसळली फांदी 

दरम्यान दीपा गावित या मुलासोबत मोटरसायकलने जात होत्या. यावेळी पावसाचे वातावरण होऊन जोरदार वारा देखील सुरु होता. अशात वाऱ्यामुळे अचानक रस्त्यालगत असलेल्या झाडाची मोठी फांदी मोटरसायकलवर कोसळली. झाडाची फांदी जाड असल्याने मोटारसायकलवर मागे बसलेल्या दीपा याना अधिक मार लागला. 

महिलेचा मृत्यू, अन्य एक जखमी 

दरम्यान फांदीचा जोरदार मार लागल्याने दीपा गावित यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालविणारा त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना उपचार सुरु असताना त्याचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, रस्त्यांलगत असलेल्या जुन्या व कमकुवत झाडांची वेळेत दुरुस्ती किंवा छाटणी का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT