Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर; नदीवर पूल नसल्याचे नागरिकांची कसरत 

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील त्रिशूल या गावात जाण्यासाठी आदिवासी बांधवांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या अक्राणी तालुक्यात आजही अनेक गावांना जोडणाऱ्या नद्यांवर पूल बांधण्यात आलेला नाही. पूल नसल्याने नागरिकांना नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तर नदीतील रास्ता पार करण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर केला जात असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील त्रिशूल या गावात जाण्यासाठी आदिवासी बांधवांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यासोबतच त्रिशूल नदीवर पूल नसल्याने नदी पात्रातून आपली वाहन काढावी लागत असतात. मात्र अनेक वाहनही नदीपात्रात अडकतात आणि त्या वाहनांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असते. अनेकवेळा या वाहनांमध्ये प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतो.

अनेक दिवस गावांचा संपर्क तुटलेला 

त्रिशूल नदीवर पूल बांधण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी पुलाची मागणी करत आहे. मात्र प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांना या समस्येला सामोरे जावं लागत आहे. अनेक वेळा या भागातून लहान बालक किंवा गर्भवती महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे. नदीला पूर (Flood) आल्याने अनेक दिवस या गावांचा संपर्क देखील तुटत असतो. प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने नदीवर पूल बांधण्याची मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ

Maratha Reservation Protest: मराठा आंदोलनामुळे भीषण वाहतूक कोंडी; चेंबूरमध्ये रस्त्यावर तब्बल ५ हजार वाहनं अडकली, VIDEO

Politics : अरविंद केजरीवालांना मोठा झटका, आपच्या मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

Maharashtra Politics: सामान्य मुंबईकरांचा काय दोष? चंद्रकांत पाटील यांची मनोज जरांगेंना हात जोडून विनंती

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय ओबीसी महासंघाला संविधान चौकात आंदोलनांस परवानगी

SCROLL FOR NEXT