Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपेना; २० किमीची जंगलातून जीवघेणी पायपीट, गावात साथ पसरली पण आरोग्य यंत्रणा पोहचेना VIDEO

Nandurbar News : गावात दूषित पाण्यामुळे रुग्ण पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत. तरी देखील आरोग्य व्यवस्था पोहोचत नाही. त्यामुळे नाईलाजाने आदिवासी बांधवांना बांबूच्या झोळी करून पाच तासांचा पायी प्रवास

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपता संपत नसल्याची परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावाला जायला अद्याप रस्ता नसल्याने आदिवासी बांधवांना रुग्णालय गाठण्यासाठी चक्क पंधरा ते वीस किलोमीटर जंगलातून जीवघेणा प्रवास करत रुग्णालय गाठावं लागत असल्याची भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे.

नंदुरबारच्या अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावातील रतीलाल पारता पाडवी (वय ३०) या आदिवासी बांधवाला गेल्या दोन दिवसांपासून पोटाचा त्रास होत आहे. यामुळे त्याला बांबूच्या झोळीतून केलापाणी ते तोरणमाळ या १५ ते २० किलोमीटरचे अंतर मुसळधार पावसात जंगलातून वाट काढत जावे लागले आहे. केलापाणी गावात जायला रस्ताच नसल्याने नेहमीच गरोदर माता असो किंवा इतर रुग्ण असो यांना बांबूच्या जोडीत करून उंच डोंगरदऱ्या पार करत रुग्णालय गाठावं लागत आहेत.

गावात पोटदुखीची साथ, आरोग्य यंत्रणा पोहचेना 
केलापाणी गावात दूषित पाण्यामुळे प्रत्येक घरात एक दोन रुग्ण पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत. तरी देखील या ठिकाणी आरोग्य व्यवस्था पोहोचत नाही. त्यामुळे नाईलाजाने इथल्या आदिवासी बांधवांना बांबूच्या झोळी करून तब्बल पाच तासांचा पायी प्रवास करत तोरणमाळ रुग्णालयात जाव लागतं आहे. इतकी भयावह परिस्थिती या गावात निर्माण झाली आहे. 

आदिवासी बांधवांकडे सातत्याने दुर्लक्ष 

गेल्या अनेक वर्षांपासून केलापाणी गावाला जायला रस्ता नाही. वारंवार गावकऱ्यांनी शासन दरबारी आपली व्यथा मांडून देखील विकासाच्या नावाने गवगवा करणारे सरकार मात्र या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अशा परिस्थितीमुळे कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार प्रशासन राहील; असा देखील संतप्त प्रश्न गावकऱ्यांनी मांडलेला आहे.

आमदार, खासदारही फिरकेनात 

केलापानी गावातील आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून गावात रस्ता, वीज, पाणी आणि नेटवर्कसाठी राजकीय नेत्यांसमोर वारंवार मागणी करत आहेत. मात्र विकासाच्या नावाने गप्पा मारणारे राजकीय नेते आणि प्रशासन याची कुठलीही दखल घेत आणि स्थानिक आमदार असो किंवा खासदार असो ते देखील कधी या भागामध्ये फिरकत नसल्याने गावकरी आता हताश झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT