महाराष्ट्र

तीन राज्‍यांच्‍या सीमेवरील गाव..स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सुविधांपासून वंचित

तीन राज्‍यांच्‍या सीमेवरील तिनसमाळ गाव..स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित

दिनू गावित

नंदुरबार : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही अतिदुर्गम सातपुडा पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शेवटचं गाव तिनसमाळ. या गावातील नागरिक मूलभूत सुविधांअभावी गावाचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करा किंवा तिनसमाळ परिसराला थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटन स्थळ घोषित करून विकास करा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करता आहे. शासन स्तरावर यासंदर्भात प्रस्तावही पाठविण्यात आले आहे. परंतु अद्याप यावर निर्णय झालेला नाही.‌ (Nandurbar-news-Tinsamal-village-on-the-border-of-three-states-but-no-devlopment)

उंच पर्वताच्या शिखरावर आदिवासी ढोल नृत्याच्या तालावर नाचणारी ही मंडळी आहे. आदिवासी समाजातील डुडवे परिवार स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून याठिकाणी डुडवे परिवारातील पूर्वज वास्तव्यास होते. आपल्या पूर्वजांना नमन करण्यासाठी मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र राज्यात विखुरलेला हा डुडवे परिवार दरवर्षी तिनसमाळ येथे एकत्र जमून मेळावा साजरा करतात. काही वर्षांनंतर या ठिकाणाहून बाकी परिवार उदरनिर्वाहासाठी इतर ठिकाणी स्थलांतर झाले. परंतु आज ही या गावात ६८३ नागरिक चार पाड्यांमध्ये दऱ्याखोऱ्यात वास्तव्यास आहेत. तिनसमाळ गावाच्या आजूबाजूचा परिसर वन क्षेत्रामध्ये गणला जातो. जवळपास १३ हजार हेक्टर जंगल या भागात आजही आहे.

पर्यटनस्‍थळ तरी व्‍हावे..

गुजरात राज्यातील सरदार सरोवर प्रकल्पात नर्मदा काठावरील अनेक गाव पुनर्वसन झाले. परंतु तिनसमाळ गाव टेकड्यांवर असल्यामुळे पुनर्वसन होऊ शकले नाही आणि विकासापासून दूर राहिले. आजही या गावातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, रस्ते मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. गेल्या तीस वर्षापासून या गावातील नागरिक गावाचे पुनर्वसन करा किंवा थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटनस्थळ घोषित करून विकास करा; अशी मागणी शासन दरबारी करत आहेत. परंतु अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही.

१९९७ पासून नुसते फिरताय प्रस्‍ताव

नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणाहून शंभरपेक्षा जास्त किलोमीटर अंतर असुन धडगाव तालुक्याहुन जवळपास १५ किलोमीटरचा खोल दर्या, उतार- चढाव, धोकेदायक वळण डोंगर रांगामधील रस्ता पार करून तिनसमाळ गाव गाठावे लागते. धडगावचे आमदार के. सी. पाडवी यांनी १९९७ साली गावाची पाहणी करून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर केला होता. २००८ पासून गावाचे पुनर्वसन किंवा पर्यटनस्थळ विकास करण्याचा प्रस्ताव निवेदनाद्वारे पाठपुरावा आजपर्यंत सुरू आहे. २०१७ साली तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या आश्वासनानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी एम. कलशेट्टी यांनी स्वतः पाहणी करून शासनाकडे प्रस्ताव पाठविला. २०१९ साली आलेले जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनीही पायी दौरा करून तिनसमाळ गावाच्या विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला. परंतु आजतागायत त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

विकास कोसो दूर

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १४ किलोमीटरचा रस्ता मंजूर असतानाही ठेकेदाराने अर्धवट काम निकृष्ट दर्जाचे करून उर्वरित रस्त्याचे कामच पूर्ण केलेले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी तर दोन ते दीड किलो मीटर खोल दरीत उतरून पाणी आणावे लागते. आरोग्य केंद्र हे नावालाच आहे. येथील कर्मचारी कायमस्वरूपी उपलब्ध होत नाही. त्यामुळे आरोग्य केंद्र नेहमी बंद अवस्थेत दिसून येते. तिनसमाळ गावाचे चारी पाडे चार ते पाच किलोमीटरवर लांब असुन एकच जिल्हा परिषद शाळा आहे. येथील बालकांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून निवासी आश्रम शाळेची मागणी अजून पर्यंत पूर्ण झालेली नाही. भारत स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही तिनसमाळ गाव सोयीसुविधांपासून वंचित आहे, आता तरी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे असे येथील सुशिक्षित नवयुवकांना वाटते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT