महिन्याच्या अंतरात पत्नीनंतर पतीनेही घेतला गळफास; सावकारी जाचाचा पेच

महिन्याच्या अंतरात पत्नीनंतर पतीनेही घेतला गळफास; सावकारी जाचाचा पेच
suicide
suicide
Published On

जळगाव : सुप्रीम कॉलनीतील नजमा मोहंमद जुबेर खाटिक (वय २८) यांनी १२ जुलैला गळफास घेतला. पत्नीच्या मृत्यूला एक महिना होत नाही, तोच पती मोहंमद जुबेर (३५) यांनी १२ ऑगस्टला घरात गळफास घेतला. सावकारी पाशात अडकल्याने पत्नी व त्यानंतर पतीने मृत्यूला कवटाळले. आत्महत्येपूर्वी पत्नीची सुसाईड नोट पोलिसांनी दडवून ठेवल्याने संबंधितांवर कारवाई होऊ शकली नाही. अखेर सावकारांनी पतीला पुन्हा त्रास दिल्याने त्यानेही गळफास घेतला. बुधवारी (ता. १८) याबाबत चौकशी केल्यावर तपासाधिकाऱ्यांनी सुसाईड नोट असल्याचे कबूल केले. (jalgaon-news-husband-suicide-Within-a-month-after-the-wife)

सुप्रीम कॉलनीतील नजमा मोहंमद जुबेर खाटिक यांचा मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात आणला. पोलिसांनी मृत महिलेजवळून सुसाईड नोट ताब्यात घेतली. सुसाईड नोट सापडली असताना, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात नवीन आलेले अधिकारी गायकवाड यांच्याकडे हा तपास सोपविवण्यात आला. गुन्ह्यात पैसा देणाऱ्या संबंधित सावकारांनाही त्यांनी चौकशीला बोलविल्याचे मृताच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. मात्र, अटक कुणालाच केली नाही.

पत्‍नीच्‍या मृत्‍यूनंतर सावकारी जाच कायम

नजमा खाटिक यांच्या मृत्यूला एक महिना उलटूनही संबंधितांवर कुठलीच कारवाई पोलिसांनी केली नाही. परिणामी, सावकाराने पुन्हा मोहंमद जुबेर खाटिक यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. संबंधितांच्या त्रासाला कंटाळून पत्नीच्या ठीक एक महिन्यानंतर १२ ऑगस्टला मोहंमद जुबेर यांनी राहत्या घरात गळफास घेतला. मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात आणल्यावर पत्नीप्रमाणेच मृत पतीच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट मिळाली. पोलिसांनी ती ताब्यातही घेतली. मात्र, या प्रकरणीही केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

suicide
आडमुठे धोरण अडतेय..पीएम किसान योजनेसाठी टोलवाटोलवी

..तर भाऊ जिवंत असता

वहिनी नजमा हिच्या सुसाईड नोटची पोलिसांनी दखल घेत कारवाई केली असती, तर माझा भाऊ जुबेर आज जिवंत असता. पोलिस कारवाई करत नाही, म्हणून समाजातील मोठ्या नेत्यांकडे प्रकरण पोचले. तेथेही दिलासा मिळाला नाही, म्हणून जुबरनेही मृत्यूला कवटाळले. या दांपत्याच्या चिमुरड्या मुलीची जबाबदारी आमच्यावर असून, ती रोजच ‘अम्मी... अब्बू कब आयेंगे’, असे विचारतच झोपते, असे मृताचा भाऊ अंजुम याने हुंदके देत सांगितले.

सुप्रीम कॉलनीतील मोहंमद जुबेर खाटिक याच्या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोट सापडली होती. ती जप्त केली असून, ते अक्षर मृताचेच आहे काय? याबाबत हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल मागविला जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल.

-विशाल सोनवणे, तपासाधिकारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com