Accident News
Accident News saam tv
महाराष्ट्र

Accident : नवापूर चरणमाळ घाटात भीषण अपघात; ट्रकचे दोन तुकडे, चालक जखमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर निकवाडे

Nandurbar Accident News : अपघातामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात आज पहाटे मका भरून घेऊन जाणारा एक ट्रक तीव्र उतारावर पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रकचे दोन तुकडे झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.

गुजरात राज्यातील धनेर अमली येथून मका भरू एक ट्रक नवापूरच्या दिशेने येत असताना चरणमाळ घाटात तीव्र उतारावर वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक डिव्हायडरवर आदळून पलटी झाला.

या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चरणमाळ घाटातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असूनच सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र सुधारणेबाबत कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती नागरिकांचा बळी व वाहनांच्या नुकसानीचे वाट पाहणार असा संतप्त सवाल या अपघातातून उपस्थित होत आहे .

मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिक अप वाहनाचा अपघात

मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 11 जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील उमरपाटा गावाला घराच्या बांधकामासाठी नंदुरबार तालुक्यातील खांदेपाडा आणि बिजादेवी गावातील मजूर पिकअप गाडीतून कामासाठी गेले होते. रात्री परत येत असताना अकरा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील खोकसा घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी घाटात 30 ते 40 फूट खोल दरीत पलटी झाली.

यात दोन महिला जागीच ठार झाल्या असून 11 जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. पण अपघात इतका भीषण होता की मजूर गाडी खाली अडकले होते शेवटी जेसीबीच्या साह्याने गाडी बाजूला करून मजुरांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातील अकरा गंभीर रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या पिक अप व्हॅनमध्ये सर्व बांधकाम मजूर होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

Today's Marathi News Live: चिपळूण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, नदी, नाले तुडूंब

Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!

SRH vs PBKS: पंजाब की हैदराबाद; कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

Railway Crime : मनमाडला रेल्वे वॅगनमधुन इंधन चोरी; सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT