Rishabh Pant Car Accident: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. शुक्रवारी (३० डिसेंबर) पहाटे पंत याच्या कारचा दिल्ली -डेहराडून मार्गावर अपघात झाला. अपघातानंतर लगेचच कारने पेट घेतला. अपघातानंतर बसचा चालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत या दोघांनी ऋषभ पंत याला गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर इतर लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले.
या प्रशंसनीय कामासाठी या दोघांनाही मोठा पुरस्कार मिळाला आहे. सुशील कुमार आणि परमजीत यांचा पानिपत डेपोने गौरव केला आहे. उत्तराखंड सरकारनेही या दोघांचा प्रजासत्ताकदिनी भव्य सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मुलासाठी देवदूत ठरलेल्या त्या तरुणांना ऋषभ पंतच्या कुटुंबियांकडून आर्थिक मदत जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या ऋषभची प्रकृती स्थिर सल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ऋषभ पंत काल दिल्लीतून उत्तराखंडमधील त्याच्या मूळगावी रुडकीच्या दिशेनं निघाला होता. तो खुद्द कार चालवत होता. गाडी चालवत असताना पंतला अचानक डुलकी आली आणि गाडीचा ताबा सुटला त्यानंतर भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकली आणि गाडीने काही वेळात पेट घेतला.
त्याचवेळी या बसच्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला अपघात झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी घटनास्थळी धाव घेत ऋषभ पंतला गाडीतून बाहेर काढलं. आणि इतरांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं. ऋषभसाठी देवदूत ठरलेल्या त्या दोन तरुणांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. या दोन्ही देवदुतांसाठी सरकारने आता मोठी घोषणा केली आहे. या दोघांचा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खास सन्मान करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती उत्तराखंडचे परिवहन मंत्री मूलचंद शर्मा यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.