Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका; केळी, पपई, कापुसाचे मोठे नुकसान

Nandurbar News : उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार व धुळे जिल्ह्यात सलग दोन दिवस वादळी वारा व जोरदार पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ आर्थिक संकट उभ ठाकल आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसापासून नंदुरबार आणि आष्ट मंडळात ६५ मिली मीटर पेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद झाली आहे. परिणामी या दोन्ही मंडळांमध्ये मोठ नुकसान असल्याचे तहसिलदारांनी स्पष्ट केले असून केळी, पपई, कापूस व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

नंदुरबार तालुक्यातील आष्टे आणि नंदुरबार मंडळात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. यात मोठ नुकसान झाले असून याठिकाणी केळी, पपई, कापुस, मका सारख्या पीकांचे मोठ नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडून नुकसान झाले आहे. तसेच जनावरांचा देखील मृत्यु झाला असल्याची माहीती तहसिलदारांनी दिली आहे. तसहिलदार प्रदीप पवारांनी आज शेताच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे. 

नुकसानीचे तातडीने पंचनामे 

नंदुरबार जिल्ह्यात दोन मंडळात अधिक नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. केली. पपईचे झाले उन्मळून पडल्याने झाडांवरील फळे देखील तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून पंचनाम्यानंतर नुकसानीची आकडेवारी समोर येणार असल्याचे तहसिलदारांनी स्पष्ट केले आहे.

जोरदार पावसामुळे ज्वारी पिक आडवे 
धुळे : धुळे शहरासह जिल्हाभरात काल झालेल्या मुसळधार पावसानंतर शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुळे जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावला गेला आहे. धुळे तालुक्यातील नगाव परिसरामध्ये ज्वारी पिकाचे उभ पीक जोरदार पावसामुळे क्षणार्धात संपूर्ण जमीनदोस्त झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT