Sindhudurg : बेकायदेशीर विदेशी मद्याची वाहतूक; ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sindhudurg News : बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक करणारा एक कंटेनर आणि त्यातील दारू असा सुमारे ६० लाख ८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. राजस्थानमधील एका कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले.
Sindhudurg News
Sindhudurg NewsSaam tv
Published On

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : परराज्यातून होणारी दारूची तस्करी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र गोवा सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करत विदेशी मद्याची वाहतूक रोखत कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ६० लाख रुपयांपेक्षा अधिकच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मद्य विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 

महाराष्ट्र- गोवा सीमेवरील बांदा- दाणोली रस्त्यावर उत्पादन शुल्क पथकाने मोठी कारवाई केली आहे. मद्य तस्करी व विक्री करण्यास बंदी असताना देखील परराज्यातून मद्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने गोवा, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून मद्य तस्करी करण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारूची होत असलेली तस्करी रोखण्यात आली आहे. यात विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. 

Sindhudurg News
'तटकरेंसारख्या xxx..' महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे गटाच्या आमदाराची दादांच्या खासदारावर जहरी टीका

सापळा रचत कारवाई 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जात असलेल्या ​​बांदा- दाणोली मार्गावरून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती उत्पादन शुल्क पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार हॉटेल सुभेदारच्या समोर पथकाने सापळा रचला. यावेळी करण्यात येत असलेल्या तपासणी दरम्यान पथकाला एक कंटेनर संशयास्पद वाटला. या कंटेनरला थांबवून त्याची तपासणी केली असता कंटेनरमध्ये २६७ सिलबंद प्लास्टिकच्या गोणी आढळून आल्या. 

Sindhudurg News
Hingoli : तलाठ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करताना अडवणूक; खासदार आष्टीकर संतापले

५० लाख रुपयांचे मद्य जप्त  

कंटेनरमध्ये असलेल्या गोण्यांमध्ये एकूण ३८ हजार ४४८ बाटल्या भरलेल्या होत्या. जप्त केलेल्या अवैध मद्याची किंमत ४९ लाख ९८ हजार २४० रुपये इतकी आहे. अवैध मद्य, वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर आणि एका मोबाईलसह एकूण ६० लाख ०८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com