MSRTC Bus Saam tv
महाराष्ट्र

MSRTC Bus: एसटी सेवा कोलमडली; नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगाराचे ३३ लाखांचे नुकसान

Nandurbar News : एसटी सेवा कोलमळली; नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगाराचे ३३ लाखाचे नुकसान

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यातील अनेक भागात उमटत आहेत. जालना येथे झालेल्या आंदोलनात बस जाळण्यात आल्या. यामुळे अनेक ठिकाणची (St Bus) बससेवा बंद ठेवण्यात आली होती. यात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात दोन दिवस बस बंद राहिल्याने जिल्ह्यातील चारही आगार मिळून ३३ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. (Tajya Batmya)

जालना येथून सुरु झालेल्या मराठा आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी आंदोलन तीव्र केले. याशिवाय या आंदोलनाचे पडसाद राज्यात देखील उमटले. या पार्श्वभूमीवर दोन दिवस नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारातील बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. यात स्थानिक व लांब पल्ल्याच्या बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. जिल्हाभरातून जवळपास ८०० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्याने एसटी महामंडळाचे (MSRTC) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एसटी महामंडळाचे एका दिवसाचे ३३ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.   

आजपासून सेवा पुर्वव्रत 

दरम्यान दोन दिवस सेवा बंद राहिल्यानंतर (Maratha Reservation) नंदुरबार जिल्ह्यातील बससेवा आजपासून नियमित सुरू झाली. सर्वच बस फेऱ्या सुरू आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे एसटी बसेसची सुरक्षितता सर्व नागरिकांची जबाबदारी असून कुणीही एसटींना नुकसान होईल असे कृत्य करू नये असे आव्हान महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Landslide: उत्तरकाशीत भूस्खलन; शेकडो घरं, दुकानं ढिगाऱ्याखाली दबली, ६० जण बेपत्ता, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Mehndi Design: या रक्षाबंधनला हातावर काढा ही साधे आणि सुंदर मेहंदी डिझाईन्स

Maharashtra Politics : महायुतीत एकनाथ शिंदे अस्वस्थ; अचानक दिल्लीवारी वाढल्या, पडद्यामागं काय राजकारण घडतंय?

Accident: प्रवाशांनी खचाखच भसलेली एसटी बस उलटली, दोघांचा जागीच मृत्यू; चंद्रपूरमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update : पोंगे व कुरकुरे बनविण्याच्या कंपनीला अचानक लागली आग

SCROLL FOR NEXT