सांगली : जालन्यातील मराठा आंदोलनातील लाठीचार्ज प्रकारामुळे राज्यभरात आंदोलन तीव्र झाले आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. तर काही (Sangli) ठिकाणी हिंसक वळण मिळाल्याने बसची (St Bus) जाळपोळ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कराड आणि सातारा येथे सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीहून (Satara) सातारा, पुणेकडे जाणाऱ्या बस थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज पुन्हा एकवटला आहे. यात जालना येथे सुरु केलेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे राज्यभरात आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटलं आहेत. सांगलीत देखील याचे पडसाद उमटत असून बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सकाळच्या सर्व बस या इस्लामपूर बसस्थानकात थांबवण्यात आल्या असून एसटी महामंडळाच्या जिल्हा प्रशासनाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. तर सोलापूर आणि कोल्हापूर मार्गावर नियमित बस सेवा सुरू आहे.
आंदोलन बंद होईपर्यंत बसही उभ्या
सकाळी पाच आणि सहा वाजेच्या दोन शिवशाही पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. त्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या बसेस आंदोलन सुरू (Jalna News) झाल्यामुळे इस्लामपूर बसस्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलन संपल्याशिवाय सांगलीहून पुण्याकडे कोणत्याही बस न पाठवण्याबाबत पोलीस विभागाने सुद्धा सुचित केले आहे. दुसरीकडे बारामतीकडे जाणाऱ्या बस सुद्धा विटा आगारात थांबवण्यात आल्या असून त्या परत बोलवण्यात आल्या आहेत. बारामतीमध्ये सुद्धा आंदोलन सुरू असल्याने सांगली जिल्ह्यातून बारामतीकडे जाणाऱ्या बसेस या विटा खानापूर आगारात थांबवण्यात आल्या आहेत. जोपर्यंत सातारा कराड मार्गावरील आंदोलन थांबत नाही. तोपर्यंत सांगली आगारातून पुण्याकडे बस पाठवल्या जाणार नाहीत; अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.