Nandurbar News : नंदूरबारला पाणीटंचाईचे संकट, शहरवासियांना हाेणार तीन दिवसाआड पाणीपुरवठा; पालिकेचा निर्णय

नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने नंदूरबारकरांना केले आहे.
nandurbar, water supply
nandurbar, water supplysaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar Water Supply News : नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात अवघ्या 32 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर पिण्यायोग्य 25 टक्के पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे आजपासून (साेमवार) तीन दिवसाआड पाणीपुरवठा नंदुरबार शहराला केला जाणार आहे. (Maharashtra News)

nandurbar, water supply
Maratha Aarakshan Andolan Live News : संभाजीराजेंनी घेतली मराठा आंदाेलकांची भेट, घटना सांगताना महिला ढसाढसा रडल्या

विरचक धरणामध्ये 90 दिवस पुरेल एवढाच जलसाठा राहिला आहे. पावसाळा सुरु होऊन जवळपास तीन महिन्याच्या कालावधीत उलट आला तरी देखील जिल्हा समाधानकारक असा पाऊस होत नसल्यामुळे मोठा अडचणीच्या सामना आता नागरिकांना करावा लागणार आहे.

nandurbar, water supply
Tadoba Online Booking: ताडोबाला जाणार आहात? वाचा ऑनलाईन बुकिंगबाबत न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

नंदूरबार जिल्ह्यात सरासरी 40 टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे पाण्याची बचत शहरवासीयांना करावी लागणार आहे. आगामी काळात पाऊस आला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. परंतु पाऊस आला नाही तर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन अमोल बागुल (मुख्याधिकारी) यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com