Shahada Police Saam tv
महाराष्ट्र

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

Nandurbar News : काही दिवसांपासून शहादा शहरात अवैध कॅफे सेंटरचा सुळसुळाट वाढला होता. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी एकत्र येऊन आक्षेपार्ह वर्तन करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
शहादा (नंदुरबार)
: शहादा शहरात अवैधपणे सुरू असलेल्या कॅफे सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना सुरू असलेल्या या कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या कारवाईमुळे शहरातील कॅफे शॉप चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून शहादा शहरात अवैध कॅफे सेंटरचा सुळसुळाट वाढला होता. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी या ठिकाणी एकत्र येऊन आक्षेपार्ह वर्तन करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या. या तक्रारींची दखल घेत शहादा पोलिसांनी काही कॅफे सेंटरवर छापेमारी करत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत काही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामुळे शहादा शहरात खळबळ उडाली आहे. 

नगरपालिका कॉम्पलेक्समध्ये अवैध प्रकार 

शहादा शहरातील अहिंसा चौक परिसरातील एका कॅफे शॉपमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात प्रायव्हेट खोल्या आढळल्या आहेत. तर, दोंडाईचा रोडवरील नगरपालिका कॉम्प्लेक्सच्या वरती सुरू असलेल्या एका कॅफे सेंटरमध्ये पार्टिशन असलेले रूम आणि सोफ्यावर वापरलेले निरोध आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

शहरातील ते कॅफे केले सील 

दरम्यान पोलिसांनी केलेल्या या छाप्यात नेमके किती कॅफे सील करण्यात आले आणि किती जणांना ताब्यात घेण्यात आले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे शहरातील अवैध कॅफे चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहादा पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पर्यटक तरूणीला आधी शरीरसंबंधाची मागणी, भररस्त्यावर हस्तमैथून; पीडितेनं VIDEO शूट करून व्हायरल केला, नेमकं घडलं काय?

Health Care : गुडघ्यांचं दुखणं थांबवण्याचा रामबाण उपाय, वापरा 'हे' घरगुती तेल

Palghar: बाळंतीण महिलेला रुग्णवाहिकेनं अर्ध्या रस्त्यात सोडलं, बाळाला घेऊन २ किमीपर्यंत पायपीट; पालघरमधील संतापजनक घटना

Maharashtra Live News Update : निवडणूक आरक्षणावर पुढील सुनावणी शुक्रवारी

Supreme Court : निवडणूक आरक्षणावर कोर्टात काय झालं? सर्वोच्च न्यायालयाने सरकार अन् आयोगाला झापलं

SCROLL FOR NEXT