Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

रस्‍ताच झाला गुलाबी; गणेश विसर्जनाला २० हजार गोण्या गुलालाची उधळण

रस्‍ताच झाला गुलाबी; गणेश विसर्जनाला २० हजार गोण्या गुलालाची उधळण

दिनू गावित

नंदुरबार : गणेशोत्‍सवात उत्‍साहाचा पारावार नाही. बाप्‍पाचे स्‍वागत करण्यासोबतच बाप्‍पाला निरोप देण्यावेळी देखील भाविकांचा उत्‍साह अधिक असतो. भाविकांच्‍या या उत्‍साहाने (Nandurbar) नंदुरबार शहरातील रस्‍ते गुलाबी झालेले पहावयास मिळाले. (Nandurbar News Ganesh Festival)

नंदुरबार जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक स्तरातून गुलालाचा अतिवापर टाळावा यासाठी जनजागृती केली जात असली तरी नंदुरबार शहरात पहिल्या टप्प्यातील (Ganesh Visarjan) गणेश विसर्जनाला २०१९ च्या तुलनेत ५ हजार गोण्या अधिक गुलालाच्या उधळल्याचे चित्र समोर आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर नगरपालिका कर्मचारी व अग्निशमन दलाच्या पथकाकडून रस्त्यावरील गुलालाची पाणी टाकून साफसफाई केली जात आहे.

अनंत चतुर्दशीला २५ मंडळांकडून विसर्जन मिरवणूक

गेली दोन वर्षे कोरोनामुळे (Corona) विसर्जन मिरवणुका निघाल्या न होत्या त्यामुळे यंदा गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साह असल्याने तब्बल २० हजार गोण्या गुलाल पहिल्याच विसर्जन टप्प्यात उधळल्या असून शेवटच्या टप्प्यात हा आकडा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नंदुरबार शहरात येत्या ९ सप्टेंबर रोजीही उर्वरित २५ मंडळांकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनही सज्ज झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT