Nandurbar News saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: वाढत्या प्रदूषणामुळे सातपुड्यातील नद्या होताय नष्ट

वाढत्या प्रदूषणामुळे सातपुड्यातील नद्या होताय नष्ट

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतरांगातुन प्रवाहित होणाऱ्या ५० हुन अधिक लहान मोठ्या (Nandurbar) नद्या आहेत. या नद्यांचे रूपांतर आता नाल्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. कधीकाळी स्थानिक नागरिकांची (Satpuda) तहान भागवणाऱ्या या नद्या आता गटारी स्वरूप झाल्या आहेत. (Live Marathi News)

नंदूरबार जिल्ह्यातील नर्मदा, तापी या दोन प्रमुख नद्या असून उमाइ, गोमाई, पातळगंगा, रंगावली आणि सातपुड्यातून वाहणारी या नद्या अनेक नागरिकांच्या तहान भागवत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या नद्यांमध्ये शहरी भागातील सांडपाणी घनकचरा, सोडल्याने या नद्या आता प्रदूषित झाल्या असून त्यांचा रूपांतर आता नाल्यात होताना दिसत आहे. एकिकडे सरकार नदी सफाईच्या नावाने अनेक योजना राबवत असून नदी सफाईवर कोटींची उधळण करत आहे. मात्र सातपुड्यातील जीवनदायीनी असलेल्या नद्या आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत या नद्या आता सफाई करून पूर्वतर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरी भागातील वाढत्या प्रदूषणाचा प्रभाव आता नद्यांवर देखील व्हायला लागला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे शहरी भागातील सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये सोडण्यात येत असते. या प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे नद्यांमध्ये असलेल्या मासे आणि सूक्ष्म जीव नष्ट होण्याच्या मार्गावर असून अनेक जीव आणि पाण्यातील औषधी वनस्पती नामशेष झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची?

Bihar Election Result Live Updates : नाचता येईना,अंगण वाकडे; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका

Bihar Election Rsult: गुंडराज संपवल्यामुळेच हा महाविजय साकार – सुधीर मुनगंटीवारांची बिहार निकालावर प्रतिक्रिया|VIDEO

Bihar Election Result: बिहार निवडणुकीचं महाराष्ट्र कनेक्शन; मुख्यमंत्री फडणवीसांचा करिष्मा, जेथे प्रचार तेथे गुलाल; ४९ एनडीए उमेदवार आघाडीवर

Maharashtra Live News Update: नवले पूल येथे वारंवार होणाऱ्या अपघातांविरुद्ध सामाजिक कायकर्ते भूपेंद्र मोरे यांनी केलं तिरडी आंदोलन

SCROLL FOR NEXT