Cordelia Cruise Case: IRS समीर वानखेडेंना याचिकेत बदल करण्याची परवानगी, लाच देणाऱ्याला करणार आरोपी

Sameer Wankhede News: समीर वानखेडे यांनी याचिकेत बदल करण्याची हायकोर्टाकडे मागणी केली होती. त्याला कोर्टाने परवानगी दिली आहे.
Samir Wankhede
Samir Wankhedesaam tv

>> सचिन गाड, साम टीव्ही

IRS officer Samir Wankhede : कॉर्डेलीया क्रुझ ड्रग्स प्रकरणात लाच आणि खंडणीचा आरोप असलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडा यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने वानखेडे यांना याचिकेत बदल करण्याची परवानगी दिली आहे. समीर वानखेडे यांनी याचिकेत बदल करण्याची हायकोर्टाकडे मागणी केली होती. त्याला कोर्टाने परवानगी दिली आहे.

कॉर्डेलीया क्रुझ ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहेत. या प्रकरणी हायकोर्टात सुनावनी सुरू आहे. दरम्यान वानखेडे यांनी या प्रकरणात केवळ लाच घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लाच देणाऱ्यालाही आरोपी करण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी याचिकेत बदल करण्याची मागणी वानखेडे यांनी केली होती. त्याला कोर्टाने परवानगी दिली आहे. (Tajya Marathi Batmya)

Samir Wankhede
Raj Thackeray Melava In Mumbai: ठाकरे बंधू एकत्र येणार का? राज ठाकरे लवकरच भूमिका करणार जाहीर

या हायप्रोफाईल प्रकरणात बॉलिवूडटा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर कारवाई न करण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आहे आरोप समीर वानखेडे यांच्यावर आहे. या लाचखोरी प्रकरणात लाच घेणारा आणि देणारा दोघेही आरोपी असल्याचा दावा वानखेडे यांच्या वकिलांनी युक्तीवादादरम्यान केला होता. (Breaking News)

Samir Wankhede
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! थेट मैदानात उतरून करणार पक्षबांधणी, छोट्या बैठकांवर देणार भर

तसेच सीबीआयने फक्त कथित लाच घेणाऱ्यांवरच गुन्हा दाखल केला असून लाच देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही असे देखील त्यांनी म्हटले होते. त्यामुळे लाच देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी वानखेडे यांनी केली होती. समीर वानखेडे यांनी आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com