Uddhav Thackeray Maharashtra Daura: उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! थेट मैदानात उतरून करणार पक्षबांधणी, छोट्या बैठकांवर देणार भर

Maharashtra Politics: या दौऱ्यात ते यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysaam tv
Published On

>> निवृत्ती बाबर, साम टीव्ही

Maharashtra Political News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आता थेट मैदानात उतरून पक्षाची बांधणी करणार आहेत. येत्या 9 आणि 10 जुलै रोजी उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत.

या दौऱ्यात ते यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे या दोन दिवसात उद्धव ठाकरे मोठमोठ्या सभा न घेता छोट्या बैठकांमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ या दौऱ्याची चर्चा होती. मंत्री संजय राठोड शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरे पोहरा देवीच्या दर्शनाला जाणार असं सांगण्यात येत होतं. अखेर 9 जुलै रोजी उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत.

Uddhav Thackeray
Shinde Group MLA Clash: मंत्रिपदावरून शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये बाचाबाची? मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने वाद मिटला!

पोहरादेवीच्या महंतांचा ठाकरे गटात प्रवेश

उद्धव ठाकरे 9 जुलैला दुपारी 2 वाजता पोहरादेवीचं दर्शन घेतील. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. संजय राठोड यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून पोहरादेवीचे महंत सुनील महाराज आणि संजय देशमुख यांचा पक्ष प्रवेश ठाकरे करण्यात आला होता.

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याला विदर्भातून सुरुवात

उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात विदर्भातून सुरु होत आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूमध्ये 10 जुलैला उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यापूर्वी 9 आणि 10 जुलैला ते यवतमाळ, वाशिम, अमरावती आणि अकोला येथील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

नऊ जुलैला पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे आधी यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. याच दिवशी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील.

Uddhav Thackeray
Maharashtra Cabinet Expansion: शिंदे गटाला आणखी किती मंत्रिपदं मिळणार? समोर आली मोठी अपडेट

आगामी निवडणुकांच्या तयारीविषयी मार्गदर्शन

यानंतर 10 जुलैला अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते कार्यक्रत्यांना पक्षाची भूमिका आणि आगामी निवडणुकांच्या तयारीविषयी मार्गदर्शन करतील. अमरावतीनंतर उद्धव ठाकरे 10 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देणार आहेत. (Maharashtra Politics)

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी छोट्या बैठकांवर जोर

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत गेल्यानंतर सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यांची सुरुवात विदर्भातून केली जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com