बुलढाणा : नुकताच समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भिषण अपघात झाला होता. त्या अपघातात २५ जणांचा (Samruddhi Mahamarg) होरपळून मृत्यू झाला होता. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील पोलीस, आरटीओ व महसूल प्रशासन (Buldhana) ऍक्शन मोडवर आले आहे. (Latest Marathi News)
बुलढाणा जिल्ह्यामध्ये अपघात टाळण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ॲक्शन मोडवर आल्याचे पहायला मिळाले. बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आज त्यांच्या कार्यालयात जिल्ह्यातील खाजगी लक्झरी बस चालक मालकांची बैठक आयोजित केली. या बैठकीत जवळपास ३० चालक- मालकांनी उपस्थिती होती. या बैठकीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून खाजगी लक्झरी बस चालक-मालकांना सूचना देण्यात आल्या.
याचे करावे लागेल पालन
प्रवाशी बसमध्ये एन्ट्री करताच बसमधील (Accident) सोयी सुविधांची आणि सेफ्टी संदर्भातील उपकरणाची त्यांना माहिती देण्यात यावी. चालकांनी मद्यपान करून बस चालवू नये, चालकाच्या केबिनमध्ये प्रवाशी बसवू नये, अवैध प्रवाशी वाहतूक करू नये, प्रवाशांची यादी नाव व पत्त्यासह अद्यावत तयार करावी. या संदर्भातली सूचना यावेळी देण्यात आल्या आहे. तर देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले गेले नाही; तर बस चालक आणि मालकांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी बैठकीत दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.