Nandurbar Police Vehicle Accident Saam tv
महाराष्ट्र

Police Vehicle Accident : पोलिसांच्‍या वाहनाला अपघात; नियंत्रण सुटल्‍याने वाहन थेट शेतात उलटले, पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी

पोलीस वाहनाचा अपघात; ताबा सुटल्‍याने वाहन थेट शेतात उलटले, पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : अक्कलकुवा येथून नंदुरबारच्या दिशेने जाणाऱ्या पोलीस वाहनाचा अपघात (Accident) झाला आहे. पोलिसांचे वाहन थेट शेतात शिरले आहे. या अपघातात (Police) पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी कर्मचारी जखमी झाले. (Maharashtra News)

अक्कलकुवा पोलिस शासकिय वाहन घेवून नंदुरबारच्या दिशेने जात होते. या दरम्‍यान गुजरात राज्यातील मोलै ते तुलसा गावा दरम्यान पोलिसांच्‍या वाहनाला अपघात झाला. गाडीवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट शेतात उलटल्याने हा अपघात झाला आहे. यात शेतातील पिकांचे देखील नुकसान झाले आहे.

तिन पोलिस कर्मचारी जखमी

या अपघातात अक्कलकुवा पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. तिनही जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. अपघातात पोलीस वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT