Bribe Trap
Bribe TrapSaam tv

Bribe Trap : महापालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

महापालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक
Published on

अक्षय बडवे

पुणे : पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)) ही कारवाई केली आहे. (Live Marathi News)

Bribe Trap
Maharashtra Rain Update: कोकण आणि विदर्भात आज मुसळधार पाऊस; मुंबई, ठाण्याचे काय? या जिल्ह्यांना यलो अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाला मिळकतीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून ना- हरकत प्रमाणपत्र घ्यायचे होते. त्यासाठी तक्रारदार यांनी कर्वे रस्त्यावरील चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात अर्ज केला होता. तक्रारदार पाणीपुरवठा विभागात गेले. त्यावेळी उमेश राजाराम कवठेकर याने ना-हरकत (Pune) प्रमाणपत्रासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने एसीबीच्या कार्यालयात अर्ज दिला.

Bribe Trap
Sangli News : बँक ग्राहकांची लाखो रुपयांत फसवणूक; आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड सेल्स ऑफिसरचा कारनामा

लाच घेताना ताब्यात

एसीबीच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला. या दरम्‍यान मंगळवारी (११ जुलै) चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात सापळा रचून कवठेकर याला लाच घेताना ताब्यात घेतले. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com