सांगली : मिरजेतील ॲक्सिस बँकेने नेमलेल्या सेल्स ऑफिसरने कोटीचा बँक ग्राहकांना गंडा घातल्याची घटना ताजी असताना आणखी एका राष्ट्रीयकृत (Bank) बँकेच्या सेल्स ऑफिसरने लाखो रुपयांचा रुपयाचा गंडा घालून गायब झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या बँक ग्राहकांनी (Sangli News) आयसीआयसीआय बँक शाखा गांधी चौक येथे गर्दी केली होती. क्रेडिट कार्ड विभाग सेल्स ऑफिसर भरत कोळी असे गंडा घालणाऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)
सांगलीच्या मिरज कुपवाड आणि विश्रामभाग या तिन्ही शाखेतील क्रेडिट कार्ड विभागात हा भरत कोळी काम पाहत होता. बँक ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या क्रेडिट कार्डवरील रक्कम व परत खातेवर भरण्यासाठी दिलेली रक्कम भरत कोळी याने परस्पर काढून घेतल्याचा आरोप बँक ग्राहकांनी केला आहे. १५ ते २० बँक ग्राहकांची सुमारे ३५ ते ४० लाख रुपये फसवणूक झाल्याचे तक्रार आयसीआयसीआय बँकेत ग्राहकांनी दिली आहे. याची दखल घेऊन बँक मुंबई मुख्य कार्यालयातून फ्रॉड इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी चौकशीसाठी शाखेत हजर झाले आहेत.
अशोक अग्रवाल यांनी क्रेडिट कार्ड बंद केले असताना सहा लाख चाळीस हजार रुपये रक्कमची फसवणुक भरत कोळी याने केली आहे. अशोक अग्रवाल यांना भरत कोळी याने रक्कम नील झाल्याचे बँकेचे सर्टिफकेट दिले आहे. अशोक अग्रवाल यांनी पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. ग्रामसेविका वैशाली गाडे, विश्वास कपूर यांच्यासह १५ ते २० ग्राहकांची फसवणूक करून भरत कोळी गायब झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.