Zp School Saam tv
महाराष्ट्र

Zp School : शंभर विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक; संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तराडी तबो येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेची बिकट अवस्था झाली आहे. विद्यार्थी संख्या चांगली असून त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची कमतरता आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तराडी तबो येथील जिल्हा परिषद शाळेत पटावर १०८ विध्यार्थी असून दररोज ८० ते ९० टक्के उपस्थिती असते. तरी नियमानुसार शाळेला शिक्षक हवे. पण गेल्या सहा महिन्यापासून एकच शिक्षक आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातील तराडी तबो येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेची बिकट अवस्था झाली आहे. विद्यार्थी संख्या चांगली असून त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची कमतरता आहे. याबाबत शिक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी वारंवार भेट देऊन सदरील शाळेत शिक्षकाची रिक्त पदे भरण्यात यावे. जेणेकरून आमचे दलित आदिवासीचे मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत; अशी मागणी केली होती. मात्र शिक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी याविषयी गंभीरता न घेतल्यामुळे अखेर संयमाचा बांध फुटला म्हणून संतप्त गावकरीनी (Zp School) जिल्हा परिषद शाळेला  कुलूप ठोकले. 

श्रीमंताचे मुलं इंग्लिश मेडीयममध्ये शिकतात. पण गरीबाची जिल्हा परिषद शाळा असून तिथे शिक्षण मिळत नसेल, तर गरिबांनी शिकायचं नाही का? एकीकडे शासन मार्फत सर्व शिक्षण अभियान राबविते जेणेकरून गरीबांचे मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. पण शहादा तालुक्यातील शिक्षण अधिकारी यांनी दखल का घेतली नाही? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT