Shruti Vilas Kadam
ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, हरभरा डाळीचे पीठ, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि तेल.
सर्व पिठे एकत्र करून त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर व मीठ घालून कोमट पाण्याने मऊ पीठ मळा.
ओल्या हाताने गोल थापून मध्यभागी छिद्र पाडल्यास थालीपीठ समानरीत्या शिजते.
मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तेल टाकून थालीपीठ खमंग भाजावे.
थोडे तीळ, लसूण किंवा हळद घातल्यास थालीपीठ अधिक स्वादिष्ट लागते.
मिश्र धान्यांमुळे थालीपीठ फायबरयुक्त, पचायला हलके आणि ऊर्जा देणारे असते.
गरम थालीपीठ दही, लोणी, तूप किंवा ठेच्यासोबत सर्व्ह करा.