Tea Acidity: चहाने अॅसिडीटी वाढतेय? मग 'या' वेळी चहा पिणं आत्ताच सोडा, आहारतज्ज्ञांचा सल्ला

Sakshi Sunil Jadhav

दिवसातून किती कप चहा?

दिवसातून 2 ते 3 कप चहा पुरेसा आहे. त्यापेक्षा जास्त चहा प्यायल्यास शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढून हृदयाची गती, तणाव आणि अ‍ॅसिडिटी वाढू शकते.

Tea and Acidity | google

रिकाम्या पोटी चहा टाळा

सकाळी उठताच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय टाळावी. रिकाम्या पोटी चहा घेतल्यास अ‍ॅसिडिटी, अपचन आणि ताण वाढू शकतो.

Tea and Acidity

फळांनी करा

चहाऐवजी ताजी फळे खाल्ल्यास पचन सुधारते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि दिवसभर ऊर्जा टिकते.

Best Time to Drink Tea

दुपारी 4 नंतर चहा पिऊ नका

सायंकाळी किंवा रात्री उशिरा चहा घेतल्यावर झोपेवर परिणाम होतो. निद्रानाश, चिडचिड आणि अस्वस्थता वाढते.

Tea Side Effects

जेवणासोबत चहा टाळा

जेवणाच्या वेळी किंवा लगेच नंतर चहा घेतल्यावर पचनावर परिणाम होतो. गॅस, पोट फुगतं आणि अपचनाची समस्या वाढू शकते.

Tea Side Effects

साखर आणि दूध कमी ठेवा

संशोधनानुसार आठवड्यातून तीन वेळा साखरेशिवाय चहा घेतल्याने हार्ट अटॅकचा धोका 20% कमी होऊ शकतो.

Tea Side Effects

चहासोबत काय खावे?

बिस्किटे, फरसाण, तळलेले स्नॅक्स टाळा. त्याऐवजी भाजलेले मखाणे, काळे हरभरे, मिश्र बिया यांसारखे पौष्टिक पर्याय निवडा.

Tea Side Effects

होणारा धोका

जास्त साखरयुक्त चहा घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. वेळेवर घेतलेला चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

Tea Side Effects

NEXT: Safari Tourism: सुट्ट्यांमध्ये फिरा हे Top 9 सफारी डेस्टिनेशन, मुलांच्या पिकनिकसाठी बेस्ट ठिकाणं

African Safari Travel Guide | google
येथे क्लिक करा