Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : भरत गावित यांना राष्ट्रवादीची उमेदवारी; नाराज कार्यकर्त्यांकडून पक्षाचा सामूहिक राजीनामा

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : भाजपचे नेते भरत गावित यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला. यानंतर पक्षाने गावित याना एबी फॉर्म देऊन विधानसभा निवडणुकीची संधी देखील दिली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याने कार्यकर्त्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले आहेत.  

नंदुरबार (Nandurbar News) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी भाजपला रामराम ठोकत नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला. यानंतर अजित पवार यांनी गावित यांना लागलीच विधानसभेची उमेदवारी देखील जाहीर केली (NCP) आहे. मात्र भरत गावित यांच्या पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्यात नाराजीनाट्य सुरु झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना पक्षाने विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उमटत आहे. 

गावित यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांकडून पक्षाचा राजीनामा देण्यात आला आहे. यामध्ये अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने भरत गावित यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच याचा परिणाम विधानसभेत निवडणुकीवर होणार का? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe: पेला ढोकळा खाल्ला का? असा बनवा ग्लास खमंग ढोकळा, पाहा खास रेसिपी

Diwali Special Saree : खास दिवाळीसाठी अशी साडी ट्राय करा; तुम्हीच सगळ्यात सुंदर दिसाल

Maharashtra News Live Updates: दिवाळीत धावणार पुणे ते नागपूर शिवनेरी बस

दिवाळीच्या दिवसात भेसळयुक्त पनीर कसं ओळखाल?

Akola News : भाजपच्या गडात उच्चशिक्षित तरुण उतरणार निवडणुकीच्या मैदानात?; वंचितकडे मागितली उमेदवारी

SCROLL FOR NEXT