सागर निकवाडे
नंदुरबार : बांगलादेशात उफाळून आलेल्या हिंसाचारात तेथील हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. या अत्याचाराचा निषेधार्थ समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने नंदुरबार जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील चारही तालुक्यात कडकडीत बंद पाडण्यात आला असून जिल्ह्यातील मुख्य चौकांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहेत.
बांग्लादेशमध्ये (Bangladesh) मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. यात तेथील अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जात असून सकल हिंदू समाजाच्यावतीने याचा निषेध म्हणून १६ ऑगस्टला जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच (Nandurbar) नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील चारही तालुक्यात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवले आहेत. व्यापाऱ्यांनी देखील या बंदमध्ये उत्फुर्तपणे सहभाग नोंदवत दुकाने बंद ठेवली आहेत.
शहरातून काढणार मूकमोर्चा
बांगलादेशातील घटनेचा निषेध म्हणून शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार घटनेच्या निषेधार्थ शहरातून मूक मोर्चाचा देखील आयोजन करण्यात आले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून दुपारी हा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील या बंदला शंभर टक्के प्रतिसाद पाहायला मिळत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.